शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कचरा उचलण्यास सुरुवात

By admin | Updated: June 29, 2016 02:15 IST

वर्गीकरणाच्या सक्तीसाठी कचरा न उचलल्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले होते.

नवी मुंबई : वर्गीकरणाच्या सक्तीसाठी कचरा न उचलल्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले होते. पालिकेच्या मनमानीविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होताच घनकचरा विभागाने सोसायट्यांमध्ये साचलेला कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी ओला - सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र बिन्स पुरविल्या आहेत. परंतु नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करण्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे प्रशासनाने वर्गीकरण केले तरच कचरा उचलण्याचा निर्णय घेतला यामुळे चार दिवस सर्व सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे ढीग तयार झाले होते. नागरिक व नगरसेवकांनी फोन केल्यानंतरही कचरा उचलला जात नव्हता. कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला होता. ‘लोकमत’ने प्रशासनाच्या मनमानीकडे लक्ष वेधल्यानंतर ठेकेदाराने तत्काळ कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. कचरा उचलल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.ओला व सुका कचरा वेगळा करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. यामुळे नगरसेवक व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. ऐरोलीमध्ये नगरसेवक एम. के. मढवी, विनया मढवी, करण मढवी यांनी त्यांच्या प्रभागातील नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे मेसेज पाठविण्यास सुरुवात केली आहे. नेरूळमध्ये नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनीही प्रभागात जनजागृती सुरू ठेवली आहे. नागरिकांनीही स्वत:ची जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. (प्रतिनिधी)सोशल मीडियाचा वापर नगरसेवक एम. के. मढवी, गिरीश म्हात्रे यांनी जनजागृतीसाठी सुरू केला आहे. ओला - सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. सर्वच लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनीही जनजागृती करण्याची गरज आहे.