शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मानखुर्दमधील आगीवर नियंत्रण, २ जखमी

By admin | Updated: January 13, 2017 07:57 IST

तब्बल १२ तासांच्या प्रयत्नांनतर मानखुर्दमधील मंडाळा परिसरातील शेकडो झोपड्यांना लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, मात्र या घटनेत २ जण जखमी झाले आहेत.

मुंबई, दि. १३ - तब्बल १२ तासांच्या प्रयत्नांनतर मानखुर्दमधील मंडाळा परिसरातील शेकडो झोपड्यांना लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, मात्र या घटनेत २ जण जखमी झाले आहेत.

गुरूवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास  मंडाळा परिसरातील शेकडो झोपड्यांना गुरुवारी सायंकाळी आग लागली. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला सोळा फायर इंजीन आणि पाच वॉटर टँकर घटनास्थळी पाठवावे लागले. रात्रभर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. वाहतूककोंडी आणि अरुंद रस्त्यांमुळे घटनास्थळी दाखल होण्यास अग्निशमन दलाला विलंब झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून घटनास्थळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या झोपड्यांतील रहिवाशांची महापालिकेतर्फे मानखुर्द महापालिका शाळा, मानखुर्द देवनार कॉलनी इंग्रजी शाळा, मानखुर्द मराठी शाळा क्रमांक एक येथे व्यवस्था करण्यात आली. या आगीत राजू यादव (३०) व अजू पाल (४०) हे दोघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेल व रद्दीची गोदामे असल्याने आग लवकर आटोक्यात आली नसल्याचे समजते.