शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 47 वर्षानंतर मुंबई मनपाला आली जाग

By admin | Updated: March 10, 2017 21:15 IST

बेकायदा बांधकाम पाडण्यात तत्पर असल्याचे चित्र उभे करणाऱ्या महापालिकेला चक्क ४७ वर्षानंतर जाग आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - बेकायदा बांधकाम पाडण्यात तत्पर असल्याचे चित्र उभे करणाऱ्या महापालिकेला चक्क ४७ वर्षानंतर जाग आली आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व येथील रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. रस्त्याच्या मधोमध बांधण्यात आलेली भिंतही काढल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगतीमार्गाला जोडणारा नवा पर्यायदेखील उपलब्ध झाला आहे. नुकत्याच ताब्यात घेतलेल्या या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. उद्यापासून हा रस्ता नागरिकांसाठी खुला होत आहे.
 
अंधेरी पूर्व, मांजरेकर वाडी परिसरातील एक ६० फुटी रस्ता आहे. या रस्त्यावर 'सिंधीया सोसायटी'ने अनधिकृत बांधकाम केले होते. यामुळे गेली ४७ वर्षे हा मार्ग बंद होता. सोसायटीने विकास नियोजन आराखड्यात प्रस्तावित रस्त्याच्या एका बाजूला अनधिकृत कम्पाऊंडचे बांधकाम तर दुस-या ठिकाणी सुरक्षा चौकी व प्रवेशद्वार बांधले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्याचा वापर करता येत नव्हता. विशेष म्हणजे विकास नियोजन आराखड्यातून या रस्त्यासाठी प्राप्त होणाऱ्या चटई क्षेत्राचा फायदा देखील संबंधित सोसायटीने सन १९६९ मध्येच घेतला होता. त्यामुळे या रस्त्याची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास विरोध केला जात होता. तसेच या आसपासच्या इतर सोसायटीमधील नागरिकांनाही या अतिक्रमणांमुळे मोठा वळसा घालून जावे लागत होते.
 
तब्बल सुमारे पाच दशक येथील नागरिकांची अशाप्रकारे गैरसोय सुरू असताना पालिका प्रशासन झोपले होते. अलीकडे या अतिक्रमणाची दाखल प्रशासनाने घेतली. त्यानुसार अखेर या ठिकाणी कारवाई करून हा रास्ता मोकळा करण्यात आला. यामध्ये विकास नियोजनात प्रस्तावित या रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे, प्रवेशद्वार व संरक्षण भिंत तोडण्यात आली.  अनधिकृतपणे बळकावलेला रस्त्याचा भाग ताब्यात आल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. गॅसची वाहिनी, विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्या व पथदिवे इतरत्र हलवून येथील मार्गावर डांबरीकरण व दुभाजक बसविण्याचे काम करण्यात आले. चार दिवसात हा रास्ता मोकळा करण्यात आला. उद्या हा रस्ता नागरिकांसाठी  खुला केला जाईल, अशी माहिती के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली.   
 
* ना. सी. फडके मार्ग व अंधेरी कुर्ला मार्ग यांना जोडणारा सुमारे दीड कि. मी. लांबीचा आणि १८.३० मीटर म्हणजेच ६० फूट एवढी रुंदी असलेला विकास नियोजन रस्ता हा एका सोसायटीने रस्त्याच्या मधोमध भिंत बांधल्याने आणि रस्त्याचा काही भाग अनधिकृतपणे कब्जात ठेवल्याने गेली ४७ वर्षे बंद होता.
 
* हा रास्ता खुला केल्याने या परिसरातील जवळपास ४० सोसायटीना त्याचा लाभ होणार आहे. या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच दोन जेसीबी व पाच डंपर वापरण्यात आले. तसेच महापालिकेचे सुमारे ६० कामगार - कर्मचारी - अधिकाऱ्यांनीही कारवाईत भाग घेतला.