मुंबई : मुंबई विद्यापीठाचे सर्व ४७७ निकाल जाहीर झाल्यानंतरही तब्बल ९ हजारांहून अधिक निकाल राखीव ठेवण्यात आले होते. हे निकाल http://www.mumresults.in या नवीन संकेतस्थळावर जाहीर होतील, असे गुरुवारी विद्यापीठाने स्पष्ट केले. पण या संकेतस्थळावर निकाल दिसत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तांत्रिक अडचणीमुळे पुनर्मूल्यांकनाच्या उत्तरपत्रिकांची तपासणीही बाकी आहे. पदव्युत्तर प्रवेशासाठी तीनच दिवस शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे.
मुंबई विद्यापीठाचे निकाल लागले असले तरीही विद्यापीठाचा वेबसाइटवर दिसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 05:11 IST