शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वय मोठं असलं तरी ‘पसंत आहे मुलगी..!’

By admin | Updated: August 8, 2016 01:45 IST

मैत्रीला आणि प्रेमाला वयाचे बंधन नसते, मग लग्नाबाबत तरी ते का असावे? ‘ती’ वयाने मोठी असली म्हणून काय झाले, तिच्यात सहजोडीदार सापडला की झाले.

पुणे : मैत्रीला आणि प्रेमाला वयाचे बंधन नसते, मग लग्नाबाबत तरी ते का असावे? ‘ती’ वयाने मोठी असली म्हणून काय झाले, तिच्यात सहजोडीदार सापडला की झाले... हे भाष्य ऐकून जरा आश्चर्य वाटेल! पण आता काहीशी अशी विचासरणी विवाह संस्थेत डोकावू लागली आहे. लग्नबंधनात अडकताना वधू ही वरापेक्षा लहानच असली पाहिजे, या पूर्वापार चालत आलेल्या पुरुषी मानसिकतेला छेद देत आता वयाने मोठी वधू करण्याकडे कल वाढला आहे. निर्णय घेण्याची क्षमता, आर्थिक स्थैर्य आणि स्वभावातील परिपक्वता या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करून वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींशी लग्ने करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही दशके मागे गेलात तर आठवेल, मुलाच्या वयापेक्षा मुलीचे वय कमीच असावे असा आग्रह असायचा. यामध्ये अधिकतर अधिकारशाही गाजविण्याची प्रवृत्ती आणि आपल्यावर ती आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अवलंबून कशी राहील हीच पुरुषी मानसिकता होती. मात्र आता काळ बदलला आहे, एकविसाव्या शतकात मुलीही नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कुणावरही अवलंबून राहण्याची गरज त्यांना राहिलेली नाही. काही वर्षांपूर्वी प्रेमविवाहामध्ये मुलगी वयाने मोठी असल्याचे कळल्यावर सर्वप्रथम विरोध केला जायचा तो त्याच्या कुटुंबाकडूनच. सुरुवातीला नाकं मुरडली जायची, पण तो ठाम आहे असं म्हटल्यावर होकार मिळायचा. पण आता ‘ती’ मोठी आहे हे सांगितल्यावरही सकारात्मक प्रतिसाद मिळतो. दोन ते आठ वर्षे वयाने मोठी असलेल्या मुलीशी लग्न करण्याला मुलांकडूनच नव्हे तर त्याच्या कुटुंबाकडूनही होकार मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे, अ‍ॅरेंज मॅरेजमध्येही वयोमर्यादा काहीशी धूसर झाली आहे. मुलगी एक किंवा दोन वर्षांनी मोठी असली तरी त्या बाबीकडे दुर्लक्ष करून विवाह करण्याचा टे्रंड रूजू लागला आहे. आर्थिक स्थैर्य, निर्णयक्षमता आणि परिपक्वता यामुळे लग्नासाठी मोठ्या मुलींना मुलांकडून प्राधान्य दिले जात आहे. लव्ह मॅरेजबरोबरच अ‍ॅरेंज मॅरेजमध्येही हे प्रमाण वाढले आहे. बदलत्या कौटुंबिक व्यवस्थेची ही नांदीच ठरली असल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे. (प्रतिनिधी)