शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरमध्येही सैराट, प्रियकरासोबत पळून गेलेल्या भाचीचा मामाने केला खून

By admin | Updated: June 3, 2016 14:05 IST

प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग मनात धरुन मामासह त्याच्या साथीदारांनी चक्क भाचीचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच दिवशी प्रेत जाळून टाकले

ऑनलाइन लोकमत - 
सोलापूर, दि. 03 - प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग मनात धरुन मामासह त्याच्या साथीदारांनी चक्क भाचीचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच दिवशी प्रेत जाळून टाकले. हा प्रकार २४ एप्रिल २0१६ रोजी मड्डी वस्ती येथे घडला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. 
 
राजश्री आकाश भोसले (वय २४, रा. रविवार पेठ, जोशी गल्ली, सोलापूर) असं मयत तरुणीचं नाव आहे. पांडुरंग विठ्ठल भोसले (वय ४५, रा.सरवदेनगर, मुळेगाव रोड, सोलापूर) यांनी या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी युवराज कोंडिबा सरवदे, विनोद कोंडिबा सरवदे, किशोर ज्ञानेश्‍वर सरवदे, अनिल नारायण सरवदे, प्रभाकर शंकर भोसले, विष्णू मारुती भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 
यातील मयत ही फिर्यादीचा पुतण्या ईश्‍वर मारुती भोसले यांच्यासोबत २८ मार्च २0१६ रोजी मुंबईला पळून गेली होती. याचा राग मनात धरुन आरोपींनी मयत राजश्रीला गोड बोलून मुंबईहून सोलापूरला आणून मामा विष्णू मारुती भोसले यांच्या घरी आणले. त्यानंतर आरोपींनी कट रचून राजश्रीला ठार मारुन त्याच दिवशी प्रेत जाळून पुरावा नष्ट केला. 
 
दिड महिन्यानंतर गुन्हा दाखल  
मयत राजश्रीला २४ एप्रिल रोजी तिच्या मामाच्या घरी आणून दुपारी दीड वाजता खून करण्यात आला. याबाबत कोणताही पुरावा सापडू नये म्हणून मयत राजश्रीचे प्रेत त्याच दिवशी जाळून टाकले; मात्र तब्बल दीड महिन्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटून मामासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी भेट दिल्याचे जोडभावी पेठच्या पोलिसांनी सांगितले.