शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

शिवसेनेसाठी राज्यसभेची वाट बिकट; अपक्षासह छोटे घटकपक्षही मविआ सरकारवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 20:10 IST

अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी निधीवाटप आणि मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे

मुंबई - राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका मतालाही खूप किंमत आहे. त्यातच अपक्ष आणि छोटे पक्षांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी किंबहुना शिवसेनेसाठी राज्यसभेची वाट बिकट असल्याचं दिसून येते. 

काही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीने सत्तास्थापनेवेळी राज्यात १७० चा आकडा गाठला होता. मात्र आता वेगवेगळ्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीची कोंडी होताना पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानं सरकारला घेरलं आहे. तर हितेन ठाकूर यांनी राज्यसभा निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी माझी तीन मते गृहीत धरू नये, असं ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे बविआची ३ मते कुणाच्या पारड्यात पडणार हेदेखील सांगता येत नाही.  

त्यातच अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी निधीवाटप आणि मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. समाजवादी पक्षानं अल्पसंख्याक विकास आणि मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आघाडीला मोठा झटका बसला आहे. समाजवादीचे अबू आझमी आणि रईस शेख असे २ आमदार आहेत. 

हितेंद्र ठाकूर म्हणाले की, काही पक्षांनी बविआचा पाठिंबा मिळेल, असे गृहित धरलेले आहे. मात्र, माझ्या पक्षाचा किंवा तिन्ही आमदारांच्या पाठिंब्याबाबत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व दोन्ही आमदारांसोबत बसून चर्चा करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर निर्णय जाहीर करेन, तोपर्यंत कोणीही आमची तीन मते ग्राह्य धरू नका असे ते म्हणाले.  जे उमेदवार उभे आहेत, त्यांनीही संपर्क साधल्याचे ठाकूर यांनी सांगितले. तर अद्याप MIM, मनसेनं आपली भूमिका स्पष्ट केली नाही. 

...तर राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटात मतदान करूराज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवरुन वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरू करावी. अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा