शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकाही शर्यतीत

By admin | Updated: January 17, 2017 01:31 IST

गेल्या वर्षभरात ३६ हजार शौचालये बांधली असून, लवकरच केंद्र सरकारच्या स्वतंत्र समितीमार्फत यासाठीची तपासणी सुरू होणार आहे.

पुणे : सर्वाधिक वेगाने शौचालय बांधणारी पालिका हा सन्मान मिळविल्यानंतर महापालिकेची वाटचाल आता ओडीएफ प्लस (एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकसंख्येकडे वैयक्तिक शौचालये असणे) हा केंद्र सरकारचा पुरस्कार मिळविण्याकडे चालली आहे. त्यासाठी पालिकेने गेल्या वर्षभरात ३६ हजार शौचालये बांधली असून, लवकरच केंद्र सरकारच्या स्वतंत्र समितीमार्फत यासाठीची तपासणी सुरू होणार आहे.पालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप व शौचालये बांंधण्याच्या कामाचे समन्वयक असणाऱ्या उपायुक्त अ‍ॅलिस पोरे यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेत पालिकेची आतापर्यंतची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. सर्वाधिक वेगाने शौचालयांची बांधणी करणारी पालिका म्हणून केंद्रीय स्तरावर गौरव झाला आहे. त्याचबरोबर सर्वाधिक शौचालये बांधली म्हणून पालिकेला देशात पहिला क्रमांकही मिळाला आहे. त्यानंतर ओडीएफ प्लस हा गौरव मिळविण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शौचालय बांधणीच्या कामाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार शहरातील प्रत्येक वसाहतीमध्ये वैयक्तिक व ते शक्य नसेल तर सार्वजनिक शौचालये बांधण्यास प्राधान्य देण्यात आले.शहरात ३६ हजार वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यासाठी पालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात अभियंत्यांची स्वतंत्र टीम स्थापन केली होती. त्यातून वेगवान बांधकाम करण्यात आले. ते करताना काही ठिकाणी या शौचालयांना ड्रेनेजची व्यवस्था नसल्याबद्दलच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यावर आयुक्तांनी चौकशी करून अशा सर्व शौचालयांना ड्रेनेज बांधण्यासाठी स्थायी समितीकडून खास निधी वर्ग करून घेतला. तसेच एकाच घरात दोन शौचालये बांधणे, जुन्याच शौचालयांची दुरुस्ती करून अनुदान लाटणे अशा प्रकारच्या तक्रारीही करण्यात आल्या असून, आयुक्त स्तरावर त्याची चौकशी करण्यात येत आहे. ही चौकशी होत असतानाही काम सुरूच ठेवल्यामुळे अल्पावधीतच पालिका उद्दिष्टपूर्ती करता आली.सर्वेक्षण नि:पक्ष होण्याचा प्रयत्नराज्य सरकारच्या टीमने शहरात नुकतीच पालिकेच्या या कामाची पाहणी केली. त्यानंतर आता केंद्र सरकारची टीम येत आहे. ते दोन दिवस शहरात पाहणी करणार आहेत. देशस्तरावर ही स्पर्धा होत आहे. अनेक शहरांनी त्यात भाग घेतला आहे. सर्वेक्षण नि:पक्षपातीपणे व्हावे यासाठी या टीमच्या दौऱ्याची माहिती जाहीर केली जात नाही. केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील वरिष्ठ अधिकारी या टीममध्ये सदस्य म्हणून आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शहरांची पाहणी झाल्यानंतर अहवाल तयार करून त्यातून विजेते घोषित करण्यात येणार आहेत.