शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कारानंतरही ती भोगते आहे मरण यातना

By admin | Updated: May 17, 2017 00:22 IST

तालुक्यातील बोईसर यादवनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून या घटनेची चित्रफीत बनवून त्याआधारे ब्लॅकमेल करून वारंवार तिचे शारीरिक शोषण

- हितेन नाईक, निखिल मेस्त्री । लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर/नंडोरे : तालुक्यातील बोईसर यादवनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून या घटनेची चित्रफीत बनवून त्याआधारे ब्लॅकमेल करून वारंवार तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या नराधमांची रवानगी कारागृहात झाली आहे. मात्र या पीडितेला शासनाच्या कोणत्याही योजनेतून मदत मिळालेली नाही. तीला घेऊन तिचा पती आजही मुंबई व गुजरातमधील एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात चकरा मारतो आहे. वारंवार झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे मानसिकदृष्ट्या खच्ची झालेल्या या पिडीतेने अ‍ॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिच्या विकारातील गुंतागुंत अधिकच वाढली आहे. कांदिवली येथे राहणाऱ्या या तरु णीचे एका तरूणावर प्रेम होते. तेथून या दोघांनीही पळून जाऊन लग्न केले व बोईसर मधील यादवनगर येथे संसार थाटला. गेली दीड वर्षे ते आनंदाने राहत होते. तिचा पती हा जानेवारी महिन्यात उत्तरप्रदेशातील गावी गेला होता. त्यादरम्यान एके दिवशी ती बाजारात जात असतांना दोन - तीन अज्ञात इसमांनी तिला पळवून सामूहिक बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिप बनविली व तिला सोडून दिले. त्यानंतर त्या क्लिपच्या धाकाने त्यांनी तिचे सतत शोषण केले. या नराधमांच्या धमक्या व सतत होत असलेल्या शोषणाला कंटाळून तिने अ‍ॅसिड प्रशान केले. स्थानिक रूग्णालयात योग्य ते उपचार उपलब्ध नसल्याने तिला वलसाड येथील कस्तुरबा दवाखान्यात नेण्यात आले अ‍ॅसिडमुळे अन्ननलिकेस इजा झाल्याचे सांगून तिला तीन दिवसांनी तेथील सिव्हिल हॉस्पिटलात दाखल करण्यास सांगितले. आरोपींना कोठडीसंदीप यादव व शिवम यादव या आरोपीना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे या नराधमांची जामिनावर सुटका न होता त्यांच्याविरुद्धचा खटला जलद न्यायालयात चालवला जाऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी जनभावना आहे.