शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या घोषणेनंतरही एलबीटीच्या धाडी

By admin | Updated: November 27, 2014 00:25 IST

भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी २३ नोव्हेंबर रोजी नागपुरात ३० दिवसात एलबीटी रद्द करू, अशी घोषणा केली. मात्र, गडकरींच्या या घोषणेनंतरही भाजपचीच

मनपा पदाधिकाऱ्यांचेही मौन : व्यापाऱ्यांमध्ये नाराजी नागपूर : भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी २३ नोव्हेंबर रोजी नागपुरात ३० दिवसात एलबीटी रद्द करू, अशी घोषणा केली. मात्र, गडकरींच्या या घोषणेनंतरही भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेने व्यापाऱ्यांवर एलबीटी धाडी घालण्याच्या मोहिमेला गती दिली आहे. यामुळे गडकरींच्या घोषणेवर महापालिकेतील त्यांच्याच सत्ताधाऱ्यांचा विश्वास नाही का, असा सवाल करीत व्यापाऱ्यांनी या कारवाईला विरोध दर्शविला आहे.गेल्या सहा महिन्यात महापालिकेने शंभरावर व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे. तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार होते. आम्ही राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करीत आहोत, असे सांगून महापालिकेतील सत्ताधारी या कारवाईचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करायचे. आता मात्र, राज्यात व महापालिकेतही भाजपचीच सत्ता असताना व्यापाऱ्यांवर एलबीटी धाडी सुरू आहेत, यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भाजपविषयी नाराजी पसरली आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याने एखाद्या विषयावर आपली भूमिका विशद केली म्हणजे ती त्या पक्षाच्या इतर पदाधिकारी व नेत्यांसाठी एक गाईडलाईन असते. ज्येष्ठ नेत्याच्या व्यक्तव्याचे संकेत समजून त्या वक्तव्याला साजेशी कृती करणे हे त्यांच्या अनुयायांकडून अपेक्षित असते. महापालिकेत मात्र, याउलट सुरू आहे. गडकरी यांनी २३ नोव्हेंबर रोजी एलबीटी महिनाभरात रद्द करण्याची घोषणा केली. मात्र, या घोषणेनंतर एलबीटीची कारवाई कमी होण्याऐवजी वाढल्याचे दिसते. २४ तारखेपासून महापालिकेचा एलबीटी विभाग अधिक सक्रिय झाला. २४ व २५ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी व्यापारी प्रतिष्ठानांवर धाडी घालून सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. यामुळे भाजपमध्ये समन्वय नाही का, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. एलबीटी रद्द करताना व्हॅटवर अधिभार आकारण्याच्या सूचना विविध व्यापारी संघटनांनी पूर्वीच्या आघाडी सरकारला केल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हॅटवर अधिभार लावल्यास निम्न शहरी, तहसील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अनावश्यक कराचा भरणा करावा लागेल, असे कारण सांगून व्यापाऱ्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यानंतर अनेक पर्याय पुढे आलेत. याशिवाय व्यापाऱ्यांच्या एका कमिटीने तयार केलेल्या अहवालात राज्याने मनपाला वर्षाकाठी १३,५०० कोटी द्यायचे आहेत. त्यासाठी व्हॅटवर अधिभार आकारण्याच्या सूचना कमिटीने अहवालात केल्या होत्या. (प्रतिनिधी)शासनाचे मंथन ‘मल्टीपॉर्इंट टर्नओव्हर टॅक्स’चा पर्याय महसुली उत्पन्न वाढीसाठी आता पुढे आला आहे. त्यावर शासनाचे मंथन सुरू आहे. या करप्रणालीत उलाढालीवर ०.२५ ते ०.५० टक्के आकारणी होईल. व्यापाऱ्यांना दर महिन्यातील उलाढालीचा हिशेब आॅनलाईन शासनाला सादर करायचा आहे. त्यावर शासन करआकारणी करेल. या प्रणालीत व्यवसायाच्या उलाढालीवर काही बंधने राहतील. याद्वारे राज्याला पुरेसे महसुली उत्पन्न मिळेल आणि वर्गवारीनुसार ते मनपाला देता येऊ शकते. या प्रस्तावामुळे सामान्य आणि गरिबांवर बोजा पडणार नाही. या प्रणालीने विविध कागदपत्रांची झंझट आणि इन्स्पेक्टर राजपासून सुटकारा मिळेल, असे मत काही व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.