शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

२००५ नंतर पोलीस भरती झालेल्यांनाही ग्रॅच्युईटी !

By admin | Updated: April 20, 2017 05:05 IST

महाराष्ट्र पोलीस दलात २००५ नंतर भरती झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलसाठी एक खूशखबर आहे.

जमीर काझी, मुंबईमहाराष्ट्र पोलीस दलात २००५ नंतर भरती झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलसाठी एक खूशखबर आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांना नाकारण्यात आलेली उपदान (ग्रॅच्युईटी) रक्कम मिळणार आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने (मॅट) एका याचिकेत त्याबाबतचा निकाल दिला असून, निवृत्त पोलिसाला सहा आठवड्यात रक्कम देण्याचे आदेश दिलेले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातून निवृत्त झालेल्या सहायक फौजदार अरुण लक्ष्मण पानसरे यांनी वित्त व गृहविभागाविरुद्ध दोन वर्षांपासून संघर्ष करून न्याय मिळविला. ‘मॅट’मध्ये अ‍ॅड. राजेश कोलगे यांनी त्यांच्यातर्फे बाजू मांडली. राज्य सरकारने २००५ नंतर भरती झालेल्या पोलिसांना निवृत्ती वेतन व लाभ न देता, त्यांच्यासाठी ‘डीसीपीएस’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत ३१ आॅक्टोबर २००५ला शासकीय अध्यादेश (जीआर) काढण्यात आला. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर अरुण पानसरे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात भरती झाले. वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्याने, ते २०१५मध्ये सहायक फौजदार पदावरून निवृत्त झाले. त्या वेळी त्यांना ‘डीसीपीएस’नुसार रक्कम देण्यात आली. मात्र, त्यामध्ये ग्रॅच्युईटीची रक्कम नसल्याने त्यांनी आक्षेप घेऊन गृहविभाग व वित्तविभागाकडे पाठपुुरावा केला. मात्र, त्यांना ही रक्कम लागू होत नसल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे त्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली. न्यायाधीकरणाचे सदस्य आर. बी. मलिक यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील श्रीमती के. एस. गायकवाड यांनी पानसरे २००५ नंतर भरती झाल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ व १९८४ च्या नियम लागू नसून, त्यासाठीच्या अध्यादेशात नियमाची तरतूद २ (क) मध्ये तसे अंतर्भूत करण्यात आल्याचे नमूद केले. मात्र, अ‍ॅड. कोलगे यांनी अध्यादेशात कोठेही तसे कोणतेही स्पष्टीकरण नसल्याचे सांगत पेन्शन व ग्रॅच्युईटी या स्वतंत्र बाबी असल्याचा युक्तिवाद केला. मलिक यांनी तो ग्राह्य मानत पानसरे यांना त्यांच्या सेवाकालावधीनुसार सहा आठवड्यात ग्रॅच्युईटी देण्याचे आदेश सरकारला दिले.