शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नव्वदीतही ‘त्या’ गातात जात्यावरील ओव्या

By admin | Updated: August 10, 2015 00:43 IST

जात्याला ईश्वर मानून त्याच्या साक्षीने म्हटल्या जाणाऱ्या ओव्या आजच्या यंत्र युगात नामशेष होत असताना एक, दोन नव्हेतर चारशे ओव्या मुखोद्गत करून अनसूयाबाई कंटुले यांनी

तुकाराम शिंदे, औरंगाबादजात्याला ईश्वर मानून त्याच्या साक्षीने म्हटल्या जाणाऱ्या ओव्या आजच्या यंत्र युगात नामशेष होत असताना एक, दोन नव्हेतर चारशे ओव्या मुखोद्गत करून अनसूयाबाई कंटुले यांनी लोकवाङ्मयाची मौखिक परंपरा जपली आहे.जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावच्या रहिवासी असलेल्या अनसूयाबाई यांचे वय ९० वर्ष आहे. काळाच्या ओघात लुप्त होणारा हा लोकसाहित्याचा खजिना त्यांनी जपला आहे. हे वाङ्मय जपले पाहिजे, असे त्यांचे मत आहे.जन्म, बारसे, लग्न, डोहाळे जेवण, सुखीसंसार, सासर, माहेर, आई -वडील, भाऊ-भावजय, बहीण त्याचबरोबर परमेश्वर, गुरू, आत्मा, परमात्मा, पंढरपूर, विठ्ठल, राम-कृष्ण यांसह अशा अनेक विषयांवरील ओवी वाङ्मयाचा ठेवा त्यांच्याजवळ आहे. आई व वडीलधाऱ्या व्यक्तींकडून हा ठेवा मिळाल्याचे त्या सांगतात. सकाळी उठोनी हात तुळशीला जोडीते देवाच्या पूजेला ओल्या मंजुळा तोडीतेया ओव्यांद्वारे देवपूजेचे महत्त्व समजावून सांगितल्याचे त्या म्हणतात. पंढरीला जाया, नव्हतं माझं मन हरीने चिठ्ठ्या, पाठविल्या दोनवृद्ध अवस्थेमुळे आषाढी यात्रेनिमित्ताने मला पंढरपूरला जाण्याची इच्छा नव्हती. पण तू यात्रेला ये, असे म्हणून सावळ्या विठ्ठलाने मला दोन चिठ्ठ्या पाठवून दर्शनाचे निमंत्रण दिल्याचा दाखला या ओवीद्वारे मिळतो, असे त्यांनी सांगितले.आताचा जमाना, युग निघालयं खोटं जेवता भावजयानंदा उचलती ताटंआजच्या स्थितीचा दाखला अनसूयाबाई या ओवीद्वारे देतात.तुकाराम म्हणे जिजे माझ्यासंग चलमागे राहिल्यानेबहू होतील तुझे हालजिजाऊ तू माझ्या सोबत चल. माझ्या पश्चात तुझे खूप हाल होतील, असे संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितले होते, असेही अनसूयाबाई म्हणतात. वारकरी संप्रदायात आयुष्य व्यतीत केलेल्या अनसूयाबाई पंधरवाडी एकादशी करतात. त्यांचा मुलगा प्रा. गणेश कंटुले यांनी ओवी वाङ्मयाचे संकलन केले आहे.