शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

ईस्थर अनुह्याचा हत्यारा दोषी

By admin | Updated: October 28, 2015 02:35 IST

सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने २९वर्षीय ड्रायव्हरला मंगळवारी दोषी ठरवले. या प्रकरणी सरकारी वकिलांनी ३४ साक्षीदारांची साक्ष नोंदवली

मुंबई : सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने २९वर्षीय ड्रायव्हरला मंगळवारी दोषी ठरवले. या प्रकरणी सरकारी वकिलांनी ३४ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सरकारी वकिलांनी ड्रायव्हर चंद्रभान सानप याच्यावरील आरोप सिद्ध केल्याने विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी सानपला दोषी ठरवले.गोरेगाव येथील टीसीएस कंपनीत काम करणारी २३वर्षीय ईस्थर ५ जानेवारी रोजी गायब झाली. घरच्यांबरोबर ख्रिसमस साजरा करण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये गेलेली ईस्थर ५ जानेवारी रोजी पहाटे ४:५५ वाजता एलटीटी स्टेशनवर उतरली. मात्र ती गोरेगावला पोहोचलीच नाही. तिचा अर्धवट जळलेला मृतदेह कांजूरमार्ग येथील खारफुटीजवळ आढळला. १६ जानेवारी रोजी पोलिसांनी ईस्थरच्या हत्येप्रकरणी चंद्रभान सानप याला अटक केली.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, सानपने ईस्थरने त्याच्या बाईकवर बसावे, यासाठी आधी तिचे मन वळवले. रस्त्यातच तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्याकडील मौल्यवान वस्तू लंपास केल्या. तिने प्रतिकार केल्यानंतर सानपने तिचा गळा आवळला होता. (प्रतिनिधी)