शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धरण सुरक्षेसाठी विभागीय स्तरावर समित्यांचे गठण

By admin | Updated: August 8, 2014 00:31 IST

मोठय़ा धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने विभागीय स्तरावर सुधारित समित्या गठित केल्या आहेत.

खामगाव: मोठय़ा धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने विभागीय स्तरावर सुधारित समित्या गठित केल्या आहेत. राज्यातील सहा विभागांमध्ये या समित्या राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने धरणांची पाहणी करून, काही त्रुटी आढळल्यास त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समित्यांची राहणार आहे.धरणांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. पुण्यातील माळीण गावात अलिकडेच घडलेल्या दुर्घटनेने धरणांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मोठय़ा धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विभागीय स्तरावर समिती स्थापन करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागासह कोकण, पुणे, नाशिक आणि मराठवाडा या सहा विभागांमध्ये सुधारित समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. क्षेत्रिय मुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेल्या या समितीमध्ये मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदींचा समावेश राहणार आहे. या समित्यांनी त्यांच्या विभागातील धरणांची वेळोवेळी पाहणी करून, धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे अपेक्षित राहणार आहे. धरणांचे बांधकाम, तेथील उपकरणांच्या आधारे मिळणारे अहवाल तसेच विविध स्तरावर असलेल्या त्रुटी तपासण्याचे काम समितीला करावे लागणार आहे. समितीला धरणांची पाहणी दोन टप्प्यांमध्ये करावी लागणार असून, सहा महिन्यातून एकदा समितीची बैठक आयोजित करणे बंधनकारक राहणार आहे.