शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २० ज्ञानमंडळांची स्थापना

By admin | Updated: May 31, 2016 06:28 IST

विश्वकोशातील कालबाह्य नोंदींमध्ये सुधारणा करून आणि त्यात नवीन संकल्पना, विचारप्रवाहांच्या नोंदींची भर घालून विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.

नम्रता फडणीस, पुणेविश्वकोशातील कालबाह्य नोंदींमध्ये सुधारणा करून आणि त्यात नवीन संकल्पना, विचारप्रवाहांच्या नोंदींची भर घालून विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य मराठी विश्वकोश मंडळाकडून राज्यभरातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात २० ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे.मराठी विश्वकोशाच्या संकल्पित २३ खंडापैकी २० खंड प्रकाशित झाले आहेत. मात्र ते पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे यातील अनेक नोंदी कालबाह्य झाल्या आहेत. या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २० ज्ञानमंडळे स्थापन करण्यात आली असल्याची माहिती राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. यानुसार मुंबई येथे १२ (आयसीटी आणि मराठी विज्ञान परिषद), पुणे ४ ( डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ-३ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर-१), जळगाव २, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर १, नाशिक १ अशा ठिकाणी २० ज्ञानमंडळे स्थापण्यासंबंधी संबंधित विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये करार झाले आहेत. पुणे विद्यापीठ, एसएनडीटी, नांदेड विद्यापीठाशी ज्ञानमंडळ निर्मित करण्यासंबंधी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून योजनेसाठी ४ कोटी ५२ लाख ४० हजार रुपयांची तरतूद केली आहे. विश्वकोशाच्या १ ते २० खंडामधील शब्दांची नव्याने नोंद यादी तयार करणे, नव्याने समाविष्ट करण्याच्या नोंदी, कालबाह्य नोंदी व अद्ययावत करावयाच्या नोंदी यांचा अहवाल तयार करणे तसेच विश्वकोशातील नोंदींच्या लेखनासाठी लेखकांसाठी कार्यशाळा आयोजित करणे आणि तज्ज्ञांनी दिलेले नोंदींचे संदर्भ, त्यासंबंधीची चित्रे, आॅडियो-व्हिज्युअल यांची पडताळणी व संपादन करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत.