शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हानिहाय एकच मंडळ स्थापन करा

By admin | Updated: April 8, 2017 03:25 IST

मुंबईसाठी एकच जिल्हानिहाय मंडळ स्थापन करण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने सरकारकडे केली

मुंबई : माथाडी कामगारांसाठी उद्योगनिहाय स्वतंत्र मंडळे ठेवण्याऐवजी संपूर्ण मुंबईसाठी एकच जिल्हानिहाय मंडळ स्थापन करण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने सरकारकडे केली आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, पूर्णवेळ अध्यक्ष व सचिवांची उणीव यांमुळे मुंबईतील माथाडी मंडळांचा कारभार डबघाईला आला असल्याचा आरोप युुनियनने केला आहे.युनियनच्या म्हणण्यानुसार, राज्यात ३६ माथाडी मंडळे असून त्यातील १० मंडळे एकट्या मुंबईत आहेत. मात्र यांमधील कोणत्याही मंडळांवर पूर्णवेळ अध्यक्ष आणि सचिव नेमलेला नाही. एकच अधिकारी दोन ते चार मंडळांचा कारभार पाहत असून, आठवड्यातून एखादा दिवस मंडळाच्या कार्यालयात उपस्थित असतात. अन्य कर्मचाऱ्यांचीही कार्यालयात वाणवा दिसते. परिणामी, मंडळाच्या कामकाजावर परिणाम झाला असून संबंधित माथाडी कामगारांना न्याय मिळत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.संघटनेचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांनी सांगितले की, सरकारने प्रत्येक मंडळावर अध्यक्ष व सचिवांसह आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी युनियन सातत्याने करत आहे. मात्र परिस्थितीत सुधारणा झाली नसून, काही मंडळांमधील कर्मचाऱ्यांची संख्या ३० टक्क्यांखाली घसरली आहे. वेळेवर पगार न होणे, मालकांकडून होणारा अन्याय दूर न होणे, निवृत्तीनंतरचे लाभ वेळेवर न मिळणे अशा अनुभवांना कामागारांना सामोरे जावे लागत आहे.नव्या मालक व कामगारांची नोंदणी होत असून आस्थापनांची तपासणीही होत नाही. या गोष्टींचा फायदा घेऊन माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात मालक मंडळी टाळाटाळ करत असल्याचा आरोपही रामिष्टे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)...तर कामगारांची ससेहोलपट थांबेलउद्योगनिहाय स्वतंत्र मंडळ ठेवण्याऐवजी जिल्हानिहाय एकच मंडळ ठेवल्यास एकच पूर्णवेळ अध्यक्ष व सचिव सगळे काम पाहू शकतील. तसेच वेगवेगळ्या मंडळांमध्ये काम करणारे कर्मचारी एकाच छताखाली आल्यामुळे परिणामकारक काम होऊन कामगारांची ससेहोलपट थांबेल.कार्यक्षेत्रामुळे कार्यक्षमतेवर परिणाम!मुंबईतील १० मंडळांचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण मुंबई शहरासोबत ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांपर्यंत विस्तारलेले आहे. अवाढव्य कार्यक्षेत्रामुळे मंडळाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे. शिवाय कामगारांनाही मंडळांच्या कार्यालयात येण्यासाठी मुंबई किंवा नवी मुंबईत धाव घ्यावी लागते. त्याऐवजी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर अशा प्रत्येक जिल्ह्यातील माथाडी कामगारांसाठी स्वतंत्र मंडळांची निर्मिती केल्यास कामात सुटसुटीतपणा येईल. मालकांच्या कुकर्माला आळा बसेल!काही माथाडी कामगारांच्या कामाला दोन विविध मंडळांच्या योजना लागू होतात. याचा गैरफायदा घेऊन काही मालक दोन्ही मंडळांकडे बोटे दाखवत कुठल्याच मंडळाचे आदेश पाळत नाहीत. अशा प्रकरणांना एकच मंडळ केल्यास आळा बसेल.