शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात संस्कृत अकादमी स्थापणार

By admin | Updated: January 3, 2016 02:52 IST

संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात

नागपूर : संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक भवनात आयोजित संस्कृत भारती विदर्भ प्रांत कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते जयराम व्यंकटेश पल्लेवार यांनी लिहिलेल्या ‘भारतरत्नमंजरी’ या संस्कृत काव्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू उमा वैद्य, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कामत, प्रचार व प्रसार प्रमुख श्री.श. देवपुजारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागांत संस्कृत भाषेचे बीएड महाविद्यालय सुरू करण्यात येईल. यासोबतच शालेय शिक्षणात संस्कृत भाषेचा समावेश कसा करता येईल, यासाठी शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून धोरण निश्चित करण्यात येईल. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.इंग्रज राजवटीत संस्कृत भाषेच्या ज्ञानापासून वंचित ठेवण्याचे जाणीवपूर्वक शिक्षण पद्धतीत बदल करून संस्कृत भाषेला दूर ठेवण्यात आले, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, इंग्रज येण्यापूर्वी भारतात संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी १२,५०० विद्यालये तर ७४२ महाविद्यालये होती.