शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

स्वतंत्र संस्था स्थापन करा

By admin | Updated: August 3, 2016 05:32 IST

उपनगरीय रेल्वेसाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची गरज असल्याची महत्त्वपूर्ण सूचना कॅग अहवालातून करण्यात आली आहे.

मुंबई : वाढत जाणारी प्रवासी संख्या, त्यामुळे सध्याच्या रेल्वे सेवेवर सोयीसुविधांचा पडणारा ताण आणि होणारा तोटा पाहता देशभरातील काही उपनगरीय रेल्वेसाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची गरज असल्याची महत्त्वपूर्ण सूचना कॅग अहवालातून करण्यात आली आहे. प्रवासी सुविधा वाढविण्यावर आणि सुरक्षेवरही भर देण्याचे या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल नुकताच संसदेसमोर ठेवण्यात आला. देशभरातील उपनगरीय रेल्वेच्या कामगिरीची माहिती घेऊन त्याचा अहवाल ‘कॅग’कडून (नियंत्रक व महा लेखापरीक्षक) तयार करण्यात आला. यासाठी देशभरातील मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेबरोबरच अन्य पाच क्षेत्रीय रेल्वेच्या २0१0 ते २0१५ या कालावधीतील प्रवासी सुविधा, सुरक्षा, अपघात अन्य माहिती घेण्यात आली आहे. सध्याच्या लोकलची प्रवासी क्षमता वाढवितानाच त्याच्या फेऱ्या वाढविण्यावर रेल्वे यंत्रणांनी भर दिला पाहिजे. जेणेकरून प्रवास सुकर होईल, अपघात कमी होतील व लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत होईल, अशी सूचना या अहवालातून केली आहे. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेवरही उपनगरीय रेल्वे यंत्रणेने भर देणे आवश्यक असल्याचे सांगतानाच इंटिग्रेटेड सिक्युरिटी यंत्रणा सगळ्या स्थानकांवर उपलब्ध करावी. यात चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर याचा समावेश करावा. सुरक्षेवरील ताण कमी करायचा असल्यास महत्त्वाच्या स्थानकांतील अनधिकृत ‘एन्ट्री-एक्झिट’ मार्ग बंद करण्यात यावेत. जेणेकरून सुरक्षेवरील ताण कमी होईल, अशी सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. सध्या रेल्वेचे उत्पन्न कमी आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी रेल्वेने अनेक उपाययोजना केल्या पाहिजेत. उत्पन्नाचे स्रोत उभे करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत सुविधा, सुरक्षा व उत्पन्नासाठी एक वेगळी संस्था उपनगरीय रेल्वे यंत्रणेसाठी स्थापन करण्याची सूचना कॅग अहवालातून केली आहे. (प्रतिनिधी)>अपघात कमी करण्यासाठी उपाययोजनाअपघात कमी करण्यासाठी फेऱ्या वाढविणे, प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, रुळांजवळील झोपड्यांच्या लगत कुंपण उभारण्यास सांगितले आहे.कॅग अहवालातून उपनगरीय रेल्वे यंत्रणांवर ताशेरे ओढतानाच प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्यात अनेक त्रुटी असल्याचे नमूद केले आहे.