शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंच निवडणुकीतून सरपंचाचे पलायन

By admin | Updated: July 14, 2016 20:36 IST

मालेगाव तालुक्यातील मेडशी ग्राम पंचायत उपसरपंच पदासाठी १४ जुलै रोजी निवडणूक असताना, विरोधी गटाचा उपसरपंच बनण्याची चिन्हे दिसताच पिठासीन अधिकारी असलेल्या

ऑनलाइन लोकमत

मेडशी, दि. १४ -  मालेगाव तालुक्यातील मेडशी ग्राम पंचायत उपसरपंच पदासाठी १४ जुलै रोजी निवडणूक असताना, विरोधी गटाचा उपसरपंच बनण्याची चिन्हे दिसताच पिठासीन अधिकारी असलेल्या सरपंच महिलेने नामनिर्देशन पत्राबबत अजब कारण पुढे करत सभागृहातून पळ काढला. त्या परत न आल्याने उपसरपंच पदाची निवडणूक होऊ शकली नाही.मेडशी ग्रामपंचायतवर मेडशीकर गटाची सत्ता असूने त्यांचे ८ सदस्य आहेत. सरपंच पदावर अनूसूचित जातीच्या सुनिता संतोष मेटांगे आहेत. गावविकासाच्या मुद्यावर पसरपंचासह तीन सदस्यांचे मतभेद झाले. उपसरपंचाने पदाचा राजीनामा दिल्याने १४ जुलै रोजी निवडणूक घेण्यात आली. दरम्यान मेडशीकर गटाच्या तीन सदस्यांनी बंड पुकारून शे. गणीभाई गटाशी हातमिळवणी केल्याने मेडशीकर गटाकडे पाच तर गणीभाई गटाकडे आठ सदस्य संख्या झाली. १४ जूलै रोजी सकाळी ११ वाजता गणिभाई गटाचे आठ सदस्य व मेडशीकर गटाचे पाच सदस्य निवडणुकीसाठी सभागृहात जमले. उपसरपंच पदासाठी गणीभाई गटाकडून मुलचंद चव्हाण तर मेडशीकर गटाच्यावतीने दत्तराव घुगे यांनी अर्ज दाखल केले. मेडशीकर गटाकडे केवळ पाच सदस्य संख्या असल्याने आणि गणिभार्ई गटाचा उपसरपंच होणार असल्याने दत्तराव घुगे यांनी निवडणुकीच्या दोन तास आधी उमेदवारी अर्ज दाखल करणे गरजेचे असल्याचे कारण पुढे करत मुलचंद चव्हाण यांचा अर्ज ११ वाजता भरला गेल्याने तो नामंजूर करावा अशी मागणी मेडशीकर गटाच्या सरपंच तथा निवडणुक अधिकारी संतोष मेटांगे यांनी ग्रामसेवकाकडे केली. ग्रामसेवकाने असा काही नियम नसल्याचे सांगून ग्रा.पं.अधिनियम समजून सांगण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मेडशीकर गटाच्या पाचही सदस्यांनी गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया थांबविली. ग्रामसेवकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुनही सभागृहात गोंधळ सुरु होता. या दरम्यान पिठासीन अधिकारी सुनिता मेटांगे या चार सदस्यासह सभागृहाबाहेर पडल्या. गणीभाई गटाचे आठही सदस्य सभागृहात हजर होते.निवडणूक प्रकरण वेगळे वळण घेत असल्याचे पाहून ग्रामसेवकाने हा प्रकार गटविकास अधिकारी संजय महागावकर यांच्या कानावर टाकला. महागावकर तातडीने दुपारी २ वाजताच्या सुमारास निवडणुकस्थळी दाखल झाले. निवडणूक अधिकाऱ्याला निर्णय न देता बाहेर पडता येत नसल्याने त्यांनी सरपंच मेटांगे यांना निर्णय देण्यासाठी सभागृहात येण्याची विनंती केली. मात्र, त्याऊपरही त्या आल्या नसल्याने निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांनी निवडणुक अधिकारी निर्णय न घेता निघून गेल्याने कार्यवाही करण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे सांगून या घटनेची नोंद प्रोसेडिंग बुकवर घेतली. दरम्यान, गटविकास अधिकारी महागावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की मेडशीकर गटाच्या सदस्यांनी घेतलेले आक्षेप नियमबाह्य असून, सरपंच तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निर्णय न देताच सभागृहात बाहेर जाणे योग्य नाही. याबाबत निर्णय देण्याची विनंती केली असता गावपुढाऱ्याने महिलेला हाताशी धरुन गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे ही लोकशाहिची हत्या आहे, असे महागावकर म्हणाले.