शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसेवा योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी

By admin | Updated: January 17, 2017 03:00 IST

आरोग्य सेवेसंदर्भातील सरकारी धोरण मुंबईत बसून ठरवले जाते.

डोंबिवली : आरोग्य सेवेसंदर्भातील सरकारी धोरण मुंबईत बसून ठरवले जाते. सर्व ठिकाणी सारखीच परिस्थिती नाही. या धोरणातील काही योजना चांगल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नाही, असे परखड मत डॉ. प्रकाश आमटे यांनी मांडले. ‘वैद्यकीय मदत निधी ट्रस्ट’चा आरोग्य सेवाव्रती पुरस्कार रविवारी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले कलामंदिरात हा सोहळा झाला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी आमटे यांना बोलते केले. शाल, श्रीफळ, मान्यपत्र, धनादेश देऊन आमटे यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे विश्वास पुराणिक या वेळी व्यासपीठावर होते. डॉ. आमटे म्हणाले की, ‘प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यांचा विचार करून धोरण ठरवले पाहिजे. कुपोषित बाळ व माता यांच्या मृत्यूचे प्रमाण पूर्वी खूप होते. आता कमी झाले आहे. इकडे मुलामुलींना समान वागणूक असल्याने स्त्रीभू्रणहत्या लोकांना माहीत नाही. मुलामुलींना सारखी वागणूक असल्याने दोघांचे महत्त्व सारखेच आहे.’ डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या, ‘महिलांच्या जीवनात अनेक सुधारणा होत आहेत. पूर्वी शिक्षणापासून दुर्लक्षित असलेल्या महिला आता मुलींना शिक्षण देऊ लागल्या आहेत. मुली शिक्षण घेऊ लागल्या असून त्याही आता फॅशन करू लागल्या आहेत. आता बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. बाळंतपण हे नैसर्गिक पद्धतीने होते, असे सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना विश्वास पुराणिक व सूत्रसंचालन डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी केले. (प्रतिनिधी) >तरुणांनी सेवेसाठी पुढे यावे : ४३ वर्षांपूर्वी आम्ही गडचिरोलीत कामाला सुरुवात केली. तेव्हा अज्ञान व अंधश्रद्धा होती. ४३ वर्षांत आता तेथे रस्ते, रुग्णालय, वीज, पाणी, शाळा अशा सुविधा आहेत. तेथे डॉक्टर, शिक्षकांची गरज आहे. यासाठी महाराष्ट्रातील तरुणांनी आता पुढे यावे आणि एक वर्ष या सेवेसाठी द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.