शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

युग हरवला, श्वास रोखला!

By admin | Updated: September 3, 2014 01:37 IST

त्या कोवळ्या जीवाचा दोष तरी काय होता हो, रोज हसतमुखाने ‘हॅलो अंकल’ म्हणणारा युग आता कधीच दिसणार नाही ही कल्पनाच असह्य आहे. काय बोलावे सुचतच नाही! छापरुनगर परिसरातील गुरुवंदना अपार्टमेंट

युगच्या हत्येमुळे हादरले शहर : हळहळ, संताप अन् आक्रोशनागपूर : त्या कोवळ्या जीवाचा दोष तरी काय होता हो, रोज हसतमुखाने ‘हॅलो अंकल’ म्हणणारा युग आता कधीच दिसणार नाही ही कल्पनाच असह्य आहे. काय बोलावे सुचतच नाही! छापरुनगर परिसरातील गुरुवंदना अपार्टमेंट जवळ राहणाऱ्या व चांडक कुटुंबीयांच्या अगदी जवळ असणाऱ्या एका व्यापाऱ्याला अश्रू आवरत नव्हते. अशी केवळ एकच व्यक्ती नव्हती तर युगच्या घरासमोर जमलेल्या हजारो नागरिकांच्या मनात दाटली होती हळहळ, आक्रोश अन् संतापाची भावना. गुरुवंदना अपार्टमेंटमधील महिलांचे डोळे तर अश्रूंनी डबडबले होते.पोलिसांवर रोष रात्री १२.३० च्या सुमारास युगच्या घरासमोर उभ्या असलेल्या काही संतप्त नागरिकांनी लकडगंज पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. तर अनेक जण गणेशपेठ पोलीस ठाण्याकडे रोष व्यक्त करण्यासाठी गेले. मुळात युगला अपहरणकर्ते शहराबाहेर घेऊन गेलेच कसे, युगच्या अपहरणकर्त्यांना पकडण्यात अपयश का आले? असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होते.आईला सांगणार कसे?युगची आईची प्रकृती अपहरणाच्या वृत्तापासूनच खालावली होती. गेल्या २८ तासांपासून स्वत:ला आणि कुटुंबीयांनाही सावरत असलेले डॉ. मुकेश चिमुकल्या युगच्या हत्येच्या वृत्ताने अक्षरश: कोलमडले. युगच्या आईला हत्येबद्दल मध्यरात्रीनंतर कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यांना झोपण्याचे इंजेक्शन देण्यात आले होते. परंतु ते काम करत नसल्याने अखेर खासगी रुग्णालयात नेण्याचे नातेवाईकांनी ठरविले. यावेळी परिसरात उभ्या असलेल्या हजारोंच्या गर्दीने शांत रहावे व त्यांना कळू देऊ नका, असे आवाहन नातेवाईकांकडून करण्यात आले.‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे वाढली गर्दीयुगच्या हत्येची बातमी ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली. छापरुनगर परिसरातील नागरिकांसोबतच महाल, इतवारी, वर्धमाननगर येथील अनेक नागरिकांनी गुरुवंदना अपार्टमेंट तसेच मेयो हॉस्पिटलकडे धाव घेतली. प्रत्येक जणाचे काळीज गहिवरले होते. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर क्षणाक्षणाच्या अपडेट्स लोक ‘शेअर’ करत होते आणि यामुळे निरनिराळ्या अफवा पसरत होत्या.मेयोमध्ये तणाव अन् लाठीमारमेयो हॉस्पिटलमध्ये युगचे शव आणणार असल्याची अफवा पसरली आणि मेयोसमोर नागरिकांची प्रचंड गर्दी जमा झाली. सुमारे दीड हजार नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. या घटनेने समाजमन सुन्न झाले होते. गर्दी वाढल्याने मेयोसमोर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. येथेही पोलिसांचा बंदोबस्त असणे आवश्यक असताना पोलिसांची अनुपस्थिती होती. अखेर रात्री १ वाजताच्या सुमारास पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला अन् गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.अवघे अपार्टमेंट जागेयुगच्या मृत्यूची बातमी येताच गुरुवंदना सहनिवास दु:खाच्या सागरात बुडून गेले. येथील महिला, लहान मुली, ज्येष्ठ नागरिक हताशपणे गॅलरीत उभे होते. रात्री उशिरापर्यंत येथील सर्व नागरिक जागेच होते आणि गर्दीला शांत राहण्याचे आवाहन करीत होते.