शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबात मुला-मुलींशी सुस

By admin | Updated: June 29, 2016 01:18 IST

कुटुंबामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. सुसंवादामुळे बऱ्याच प्रकारचे गुन्हे तुलनेने कमी होतील.

बारामती : कुटुंबामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. सुसंवादामुळे बऱ्याच प्रकारचे गुन्हे तुलनेने कमी होतील. मैत्रीचे ‘सर्कल’ चांगल्या विचारांचे ठेवा. शालेय दक्षता समिती स्थापन करून त्यामध्ये पालक-शिक्षक आणि संस्था प्रतिनिधींनी एकत्रित येणे गरजेचे आहे, असे मत अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजीराव चिखले यांनी व्यक्त केले.कृषी विकास प्रतिष्ठानच्या शारदा महिला संघ आणि बारामती ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कायदे महिलांसाठी व प्रतिसाद अ‍ॅप’ या कार्यक्रमात जनजागृती शिबिरात ते बोलत होते. या वेळी बचत गटातील महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.चिखले म्हणाले, की परिपूर्णता येण्यासाठी केवळ हुशारी असून चालत नाही, तर एकत्रित येणे गरजेचे आहे. छुपा कॅमेरा कोठेही असू शकतो, याची जाणीव ठेवा. या वेळी संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार म्हणाल्या, की महाविद्यालयामध्ये कोणत्याही मुलीने रॅगिंगचे प्रकार घडत असल्यास संस्थेच्या निदर्शनास आणून द्यावे. पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्या सांगाव्यात. या वेळी महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह प्रतिबंधक, बलात्कार, गर्भपातविषयक कायदाबाबत माहिती दिली. प्रशांत निंबाळकर, प्रकाश साळुंके, श्रीकांत काटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रा. पुरी यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब नगरे यांनी आभार मानले.