शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पारा चढल्याने तापाच्या रुग्णांत वाढ

By admin | Updated: April 6, 2016 01:36 IST

उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ झाल्याचे दिसत आहे.

पुणे : उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ झाल्याचे दिसत आहे. या काळात वातावरणातील उष्णता एरवीपेक्षा जास्त असते. बाहेरील उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. या तापमानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न शरीर करत असल्याने जास्त प्रमाणात घाम येतो. वातावरणातील उष्णतेने व्यक्तीच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. अशाप्रकारे शरीरातील पाण्याची पातळी खालावल्याने मेंदूतील थर्मोस्टॅटचे काम बिघडते आणि ताप येतो. हा ताप साधारण १२ तास राहतो व त्यानंतर कमी होतो, काही काळाने पुन्हा येतो. अशाप्रकारे बराच काळ शरीर बाहेरील तापमानाला प्रतिक्रिया देत असते. हा ताप लवकरात लवकर कमी होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास व्यक्तीला उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता असते,असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. अशाप्रकारचा ताप आल्यास जास्तीत जास्त पाणी पिणे, शरीरातील क्षारांचे प्रमाण वाढविणे आणि अंग गार पाण्याने पुसून घेणे हे उपाय करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुले व तरुणांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने अशाप्रकारचा विषाणूजन्य ताप येण्याचे प्रमाण त्यांच्यात जास्त असल्याचेही ते म्हणाले. विषाणूजन्य आजारांबरोबरच उन्हाळ््यात गोवर, कांजिण्या यांसारख्या विषाणूजन्य आजारांची संख्याही वाढते. उन्हाचा तडाखा जास्त असल्यास या काळात पोट बिघडून गॅस्ट्रोसारख्या आजारांच्य रुग्णांतही वाढ होत असल्याचे जनरल फिजिशियन डॉ. अच्युत जोशी म्हणाले. उन्हाळ््याच्या काळात उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्यात आल्यास अशाप्रकारचे त्रास उद्भवत असल्याचे ते म्हणाले.