शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इफेड्रीन : अमेरिकन पोलिसांनी दिले ममता आणि विकी विरुद्धचे महत्त्वाचे दुवे

By admin | Updated: August 10, 2016 22:00 IST

सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून ठाणो पालिसांनी 20 टन इफेड्रीन आणि सुडोइफेड्रीन तसेच तीन टन अॅसेटीक अनहायड्रेड असा 23 टनाचा अडीच

- जितेंद्र कालेकर

ठाणे, दि. 10 -  सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून ठाणो पालिसांनी 20 टन इफेड्रीन आणि सुडोइफेड्रीन तसेच तीन टन अॅसेटीक अनहायड्रेड असा 23 टनाचा अडीच हजार कोटींचा अंमली पदार्थ हस्तगत केला. आतापर्यंत प्रकरणी दहा जणांना अटक केली असून आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी आणि एकेकाळची अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्यासह पाच जणांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणो पोलिसांनी अमेरिकन अंमली पदार्थ विरोधी पथकाचे भारतातील प्रमुख डेरीक ओडने यांना दिली. तर ओडने यांनी विकी आणि ममता संदर्भातील काही महत्त्वाचे दुवे ठाणे पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.    ओडने यांच्या पथकाने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मंगळवार आणि बुधवार अशी दोन दिवस भेट घेऊन या प्रकरणाशी संबंधित आरोपी तसेच इतर दुव्यांबाबत चर्चा केली. आतार्पयत एव्हॉनचा संचालक मनोज जैन याच्यासह दहा जणांना अटक केली असून आंतरराष्ट्रीय  ड्रगमाफीया विकी गोस्वामी, अभिनेत्री ममता कुलकर्णी, किशोर राठोड, डॉ. अब्दुल्ला आणि त्याचा साथीदार अशा पाच जणांचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाणो पोलिसांनी सांगितले. विकी आणि ममता केनियात असून त्यांचे व्हॉटसअॅप, मोबाईलवरील संभाषण फेसबुक, इमेल वरील पत्रव्यवहार आणि बँक खात्यातील तपशील देण्याची मागणी या अमेरिकन पथकाकडे करण्यात आली. त्यापैकी काही महत्त्वाचे दुवे  ठाणो पोलिसांना दिल्याची माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला दिली. आता हिच माहिती न्यायालयात सादर करण्यात येणार असून तिच्या आधारे रेड कॉर्नर नोटीसची प्रक्रीयाही वेगाने करण्यात येणार आहे. इफे ड्रीन अर्थात ‘ईडी’ पावडरचा साठा जप्त केलेली सोलापुरातील कंपनी हिच भारतातील मुख्य वितरण कंपनी होती. तिथूनच अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट सुरु होते. केवळ भारतातच नव्हे तर युरोप, मलेशिया आणि पोलंड आदी देशांमध्ये त्याचे वितरण या कंपनीतून केले जात होते. जय मुखी याने इफेड्रीनचा कच्च माल सोलापूरच्या कंपनीत पुरविला. पुनित o्रींगी हा कंपनीचा संचालक मनोज जैन याच्या सांगण्यावरुन मालाची कशी तस्करी करायचा. तसेच जयमुखी आणि किशोर राठोड हे कसे देश विदेशात याचे वितरण करायचे, याचीही माहिती दिली. या सर्व माहितीची तसेच एकमेकांकडे असलेल्या पुराव्यांची खातरजमा ठाणो आणि अमेरिकन पोलिसांकडून करण्यात आली. ममता आणि विकी यांच्याविरुद्धचे भक्कम पुरावे गोळा करुन त्यांना भारतात आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु असल्याचेही एका अधिका-यांने सांगितले.सोलापूरमध्ये आणखी काही कामगारांची चौकशी...दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी ठाणो पोलिसांनी एव्हॉनमध्ये छापा टाकला तेंव्हा काही कामगारांची चौकशी झाली नव्हती. आता पुन्हा नव्याने त्यातील सात ते आठ कामगारांची चौकशी करण्यात आली. कंपनीच्या गोदामातील माल जसा बाहेर काढला जात होता तसाच नव्याने निर्मिती केलेल्या इफे ड्रीन आणि सुडोइफे ड्रीन्ही देश विदेशात पाठविण्यासाठी बाहेर काढला जात होता, अशी माहिती या कामगारांनी दिल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी सांगितले.‘‘ अमेरिकन पोलीस आणि ठाणो पोलिसांनी एकमेकांना नेमकी कोणती माहिती दिली. याबाबतचा तपशील देणो तपासाच्या दृष्टीने उचित ठरणार नाही. त्यामुळे ही माहिती देता येणार नाही.’’- मकरंद रानडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे