शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

इफेड्रीन : मनोज जैनसह तिघांचे जामीन ठाणे न्यायालयाने फेटाळले

By admin | Updated: July 7, 2016 19:10 IST

सुमारे 23 हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणातील मुख्य आरोपी एव्हॉन लाइफसायन्सेस प्रा.लि. या कंपनीचा माजी संचालक मनोज जैन, व्यवस्थापक राजेंद्र डिमरी आणि माल टेम्पोतून इतरत्र नेणारा बाबा

ऑनलाइन लोकमतठाणे : सुमारे 23 हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणातील मुख्य आरोपी एव्हॉन लाइफसायन्सेस प्रा.लि. या कंपनीचा माजी संचालक मनोज जैन, व्यवस्थापक राजेंद्र डिमरी आणि माल टेम्पोतून इतरत्र नेणारा बाबा धोत्रे या तिघांचेही जामीन अर्ज ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश एच.एच. पटवर्धन यांनी गुरुवारी फेटाळले. तिन्ही आरोपी हे सकृतदर्शनी या संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याचे मतही न्यायालयाने या वेळी नोंदवले. इफे ड्रीन हे सबस्ट्रॅक्ट ड्रग असून त्याचा औषधनिर्मितीमध्ये उपयोग होतो, असा दावा करून आरोपींनी न्यायालयाकडे जामिनाची मागणी केली होती.ठाणो पोलिसांनी सोलापूरच्या एव्हॉन कंपनीवर छापा टाकून इफेड्रीनचा मोठा साठा जप्त केल्यानंतर जैनसह 1क् जणांना अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातील जैन, डिमरी आणि धोत्रे या तिघांनी जामीन मिळवण्यासाठी ठाणो विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर गेल्या दोन आठवडय़ांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यावर, गुरु वारी सुनावणी झाली. विशेष न्यायालयाने यापूर्वीच सुशील असीकन्नन या फरारी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. जैन इफेड्रीनचा उत्पादक असून त्याच्याच माध्यमातून या तस्करीचे काम बिनबोभाटपणो सुरू होते.

कंपनीत निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम करणारा डिमरी याने इफेड्रीनच्या निर्मितीपासून ते तस्करीर्पयत अनेक प्रकारे मनोजला मदत केली. तर, धोत्रे हा स्थानिक ह्यदादाह्ण असून त्याने मालाची वाहतूक करण्यासाठी टेम्पो आणि काही मजूरही पुरवले, असे या तिघांवर आरोप आहेत. मात्र, त्यांच्यावरील आरोप खोडताना अ‍ॅड. एच.एच. लाला आणि अय्याज खान या आरोपीच्या वकिलांनी इफे ड्रीन हे सबस्ट्रॅक्ट ड्रग असून त्यापासून औषधनिर्मिती केली जाते, असा दावा केला.

ठाणो पोलिसांनी पकडलेल्या ड्रगच्या किमतीही फुगवल्याचा तसेच यामध्ये सनसनाटी निर्माण करण्यासाठी नाहक अभिनेत्री ममता कुलकर्णीचे नाव गोवल्याचा आरोप केला. तसेच इफेड्रीनच्या रासायनिक तपासणीतही अमली पदार्थ आढळले नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. या सर्व आरोपांना विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी जोरदार आक्षेप घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. इफेड्रीनमध्ये फॉस्फरसची एक काडीही मिसळली तरी मेथ तयार होते. मेथपासून वेगवेगळे अमली पदार्थ तयार केले जातात. एखाद्याला स्फोटके बनवण्याचा परवाना असतो म्हणजे त्याने त्याचा वापर कशाही प्रकारे करायचा, असे नसते.

त्याचप्रमाणो औषधनिर्मितीचा यांना परवाना होता, पण त्याचा कशा प्रकारे त्यांनी दुरुपयोग केला, हेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पोलीस हे समाजहिताला बांधील आहेत. त्यामुळे एखाद्या अभिनेत्रीचे नाव घेऊन ह्यइश्यूह्ण वाढवण्याचाही प्रश्नच नसल्याचेही अ‍ॅड. हिरे यांनी न्यायालयाला पटवून दिले. या सर्व बाबींची पडताळणी करून न्या. पटवर्धन यांनी तिघांचाही जामीन अर्ज फेटाळला.