शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

इफेड्रीन प्रकरण - ममताला दोन वर्षापूर्वी केनियात भेटले - मोलीना कुलकर्णी

By admin | Updated: July 14, 2016 20:31 IST

ममताच्या आग्रहाखातर तिला भेटण्यासाठी केनियात गेले होते. तिथे आमची भेट झाली, पण विकीशी भेट किंवा बातचीतही झाली नाही. गेल्या 15 वर्षात तिने आपल्याला पैसेही

- जितेंद्र कालेकर

ठाणे : ममताच्या आग्रहाखातर तिला भेटण्यासाठी केनियात गेले होते. तिथे आमची भेट झाली, पण विकीशी भेट किंवा बातचीतही झाली नाही. गेल्या 15 वर्षात तिने आपल्याला पैसेही दिले नसल्याचा दावा दाक्षिणात्य अभिनेत्री मोलीना कुलकर्णी हिने ठाणे पोलिसांकडे केला आहे.सोमवारी तिने आपला जबाब नोंदवल्यानंतर बुधवारी पुन्हा तिचा पुरवणी जबाब नोंदवण्यासाठी ती ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या कार्यालयात आली होती. त्या वेळी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या पथकाला तिने ही माहिती दिली. मोलीना (रा. मीरा रोड, ठाणे), मोनिका (रा. बंगलोर) आणि ममता (रा. अंधेरी, सध्या केनिया) अशा तिघी बहिणी असून त्यांना आरटीओ अधिकारी म्हणून निवृत्त झालेले वडील मुकुंद कुलकर्णी यांनी प्रत्येकी 25 लाख रुपये दिले. त्याच पैशांची बँकेत गुंतवणूक करून गुजराण करीत आहेत. काही वर्षापूर्वी मोलीनाने दाक्षिणी चित्रपटांमध्येही काम केले. आता आपण साईबाबांची निस्सीम भक्ती करत असल्याचेही ती म्हणाली. 1986 मध्ये विवाह झाला. पण, पतीच्या त्रसाला कंटाळून त्याच्याशी 1989 पासूनच फारकत घेतली. 2000 पूर्वी ममता पैसे द्यायची. त्यानंतर, तिने पैसे देणो बंद केले. एकटीच असल्यामुळे गरजाही फार नाहीत. त्यामुळे फारसे पैसेही लागत नाहीत, म्हणून ममताकडून पैसे घेण्याचाही प्रश्नच नाही. 2002 र्पयत ममता मुंबईतच (भारतात) होती. त्यानंतर, ती दुबईत गेली. ममताच्या आग्रहाखातर 2014 मध्ये तिला भेटण्यासाठी केनियात गेले. तिथे तिची भेट झाली. त्या काळात विकी एकदा घरी आला. पण, त्याच्याशी बातचीत किंवा भेटही झाली नाही.विकीला ममताची मदतदुबईत विकी गोस्वामीला अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मरेर्पयत जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तिथे त्याला शेख अदालतीमार्फत सोडवण्यासाठी ममताने विशेष प्रयत्न केले. त्याच अदालतीने त्याची शिक्षाही माफ केल्याची माहिती सूत्रंनी दिली. निर्मात्यांचा बहिष्कार2003 मध्ये ममता बुरखा घालून फिरायची. त्याच काळात तिचे तोकडय़ा कपडय़ांतील काही मॉडेलिंगचे फोटो प्रदर्शित झाल्यामुळे ती एकदमच चर्चेत आली. शिवसेनेसह काही निर्मात्यांनीही तिच्यावर बहिष्कार घातला होता. त्यानंतरच ती विकी गोस्वामीकडे दुबईत गेल्याची चर्चा होती.बंगलोरमध्ये राहणारी मोनिका ही दोन क्रमांकाची बहीण असून ती आजारी असते. तिघी बहिणी स्वतंत्र वेगवेगळ्या असून आईवडिलांचे निधन झाले आहे. मोलीनाने ही सर्व माहिती दिली असली तरी तिच्या बँक खात्यांची पडताळणी केली जाणार असून गरज पडल्यास तिला पुन्हा चौकशीला बोलवले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांनी सांगितले.