शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एफआयआर डिजिटल स्वरूपात घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:51 IST

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास, तसेच गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांनी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. गुन्ह्याची फिर्याद (एफआयआर) डिजिटल स्वरूपात घ्यावी

मुंबई : राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास, तसेच गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांनी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. गुन्ह्याची फिर्याद (एफआयआर) डिजिटल स्वरूपात घ्यावी, तसेच मोबाइलवरून नागरिकांना तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांना केली.राज्याच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या अर्धवार्षिक परिषदेत ते बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मलिक, गृहविभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथुर, मुंबईचे आयुक्त दत्ता पडसलगीकर उपस्थित होते. पोलीस दलाच्या ‘दक्षता’ मासिकाच्या गणेशोत्सव व स्वातंत्र्य दिन विशेषांकाचे, तसेच मासिकाच्या फेसबुक पेजचे अनावरणही या वेळी करण्यात आले.फडणवीस म्हणाले, ‘पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात यावा. राज्यातील अनेक अधिकाºयांकडे नवनवीन कल्पना आहेत. या कल्पना एकत्रित करून, त्याचा वापर आपल्या कामामध्ये करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यात गुन्हे व गुन्हेगारी माग काढण्यासाठी अन्वेषण यंत्रणा व प्रणाली (सीसीटीएनएस) हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती जमा झाली आहे. त्याचे विश्लेषण करून त्याचा वापर दैनंदिन कामात वाढविण्यासाठी पोलीस अधिकाºयांनी प्रयत्न करावेत,’ असेही त्यांनी पुढे सांगितले. या वेळी गृहराज्यमंत्री केसरकर व डॉ. रणजित पाटील यांची भाषणे झाली. पोलीस महासंचालक माथुर व मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पोलिसांच्या योजनांचे सादरीकरण केले. या वेळी अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी, आस्थापना विभागाचे राजेंद्रसिंंह, नियोजन व तरतूद विभागाचे लक्ष्मीनारायण अधिकारी उपस्थित होते.