शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

वैद्यकीय प्रवेशातील ‘गुणदान’ बंद

By admin | Updated: July 10, 2017 04:27 IST

वीस वर्षांपासून वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी खेळाडू, एनसीसी व इतर काही विद्यार्थ्यांना दिले जाणारे अतिरिक्त गुणदान अखेर बंद करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वीस वर्षांपासून वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी खेळाडू, एनसीसी व इतर काही विद्यार्थ्यांना दिले जाणारे अतिरिक्त गुणदान अखेर बंद करण्यात आले आहेत. मागील वर्षी राज्याच्या विधी व न्याय विभागाने त्यावर आक्षेप घेत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात हे गुण न देण्याचे फर्मान सोडले होते. एमबीबीएस, बीडीएससह सर्व वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अतिरिक्त गुण ग्राह्य धरले जात होते. खेळाडू, एनसीसीचे विद्यार्थी, हैदराबाद-गोवा मुक्ती लढा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना त्याचा लाभ मिळत होता. चारही घटकांसाठी प्रत्येकीदोन गुण दिले जात होते. प्रवेश परीक्षेचे गुण व अतिरिक्त गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जात होती. अनेक विद्यार्थ्यांना २ ते ८ गुण मिळत असल्याने फायदा व्हायचा. राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत २० अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. वैद्यकीय वगळता इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असे अतिरिक्त गुण दिले जात नाही, ही बाब विधी विभागाने मांडली होती. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने त्यास विरोध दर्शविला होता. विधी विभागाने सुरूवातीला परवानगी दिली. मात्र नंतर अतिरिक्त गुण देण्याचा प्रस्ताव अमान्य केला होता. >अर्ज करण्यासाठी आज अखेरची मुदतएमबीबीएस व बीडीएससह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याची सोमवारी अंतिम मुदत आहे. ५ वाजेपर्यंत आॅनलाइन अर्ज भरता येतील. १२ जुलैला प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. हरकतींनंतर १४ जुलैला सुधारित यादी प्रसिद्ध होईल. चार केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यानंतर २४ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.नीट गुणांवरच प्रवेशयंदा केवळ ‘नीट’ गुणांच्या आधारेच प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना त्यात अतिरिक्त गुण दिले जाणार नाहीत. केवळ ‘नीट’मधील गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.- डॉ. प्रवीण शिनगारे,वैद्यकीय शिक्षण संचालक