शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया : आतापर्यंत ३५ टक्के जागांवरच प्रवेश

By admin | Updated: July 26, 2016 21:26 IST

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या तीन प्रवेश फेऱ्या संपल्या असून यात महाविद्यालयांसाठी फारसे आशादायक चित्र समोर आलेले नाही.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २६ : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या तीन प्रवेश फेऱ्या संपल्या असून यात महाविद्यालयांसाठी फारसे आशादायक चित्र समोर आलेले नाही. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत ३५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चिती केली आहे. बदललेल्या नियमांनुसार चौथ्या प्रवेशफेरीसाठी विद्यार्थ्यांना नवीन आॅप्शन फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या आशा या फेरीवर टिकून आहेत.

नागपूर विभागातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या एकूण २५,२९२ जागा आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नव्या नियमांनुसार यंदा विद्यार्थ्यांना आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. याअगोदर सीईटीत चांगले गुण मिळाल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना आवडते महाविद्यालय किंवा शाखा मिळत नव्हती. पहिल्या फेरीत जे महाविद्यालय मिळाले आहे, तेथेच प्रवेश घ्यावा लागत होता.

कॅपच्या पहिल्या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी १०० महाविद्यालयांचे विकल्प दिले होते. तिसऱ्या फेरीपर्यंत आवडते महाविद्यालय मिळाले नाही तर चौथ्या फेरीत त्यांना महाविद्यालयांचे विकल्प बदलण्याची संधी आहे. प्रक्रियेदरम्यान जागेसंदर्भातील आपली भुमिका विद्यार्थ्यांना फ्रीझ, स्लाईड, फ्लोट या विकल्पांतून सांगायची होती.

त्यानुसार तिसऱ्या फेरीअखेर ८ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी फ्रीझचा विकल्प निवडून आपली जागा निश्चित केली आहे. हे विद्यार्थी पुढील फेऱ्यांसाठी पात्र राहणार नाहीत. परंतु अनेक विद्यार्थ्यांनी आवडते महाविद्यालय व शाखा मिळेल या अपेक्षेत स्लाईड व फ्लोट या विकल्पांची निवड केली. त्यांनी प्रवेशासाठी फ्रीझ विकल्प न घेतल्यामुळे त्यांची प्रवेशनिश्चिती झाली नाही. त्यामुळे या उमेदवारांना आता चौथ्या फेरीत नव्याने महाविद्यालयांचा विकल्प क्रम द्यायचा आहे.