शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याची अंमलबजावणी करा - हायकोर्टाचे आदेश

By admin | Updated: February 27, 2016 02:23 IST

राज्यातील पोलिसांकडे गेले कित्येक वर्षे ‘ब्रीथ अ‍ॅनेलायझर’ मशिनची कमतरता आहे. यावरूनच राज्य सरकार वाहन कायद्यातील कलम १८५ची अंमलबजावणी करण्यात कमी पडत

मुंबई : राज्यातील पोलिसांकडे गेले कित्येक वर्षे ‘ब्रीथ अ‍ॅनेलायझर’ मशिनची कमतरता आहे. यावरूनच राज्य सरकार वाहन कायद्यातील कलम १८५ची अंमलबजावणी करण्यात कमी पडत असल्याचे स्पष्ट होते, अशी चपराक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला लगावली.राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये किती ‘ब्रीथ अ‍ॅनेलायझर’ आहेत, अशी चौकशी सरकारकडे केली होती. त्यावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी १,०७१ ‘ब्रीथ  अ‍ॅनेलायझर’ची कमतरता असल्याची माहिती न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाला दिली. मुंबईतील पोलीस ठाण्यांत राज्य सरकारने दिलेले ७८ ‘ब्रीथ अ‍ॅनेलायझर’ आहेत; तर खासगी कंपन्यांनी ६५ ‘अ‍ॅनेलायझर’ दिले आहेत. मात्र त्यातील २४ बंद पडलेली आहेत. त्यामुळे आता केवळ ११९ मशिन्स उपलब्ध आहेत. मुंबईला एकूण ३२७ मशिन्सची आवश्यकता आहे; तर उर्वरित राज्यासाठी १,१७४ची आवश्यकता असून, ५०७ उपलब्ध आहेत. त्यातील १९६ बंद अवस्थेत आहेत. आणखी ८६३ मशिन्सची कमतरता आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी) सरकारला टोलागेले कित्येक वर्षे मशिन्स उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. याचा अर्थ राज्य सरकार वाहन कायद्यातील कलम १८५ची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत नसल्याचे सिद्ध झाले आहे,’ असा टोला खंडपीठाने राज्य सरकारला लगावला.