शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वीज दर कपातीचे ऊर्जामंत्र्यांचे संकेत

By admin | Updated: January 13, 2015 01:22 IST

विजेच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, वीज गळतीमुळे होत असलेले नुकसान यामुळे विजेच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसतो आहे. वीज दर कमी करण्यासाठी आवयक असलेल्या

नियामक आयोगाकडे प्रस्ताव देणारनागपूर : विजेच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, वीज गळतीमुळे होत असलेले नुकसान यामुळे विजेच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसतो आहे. वीज दर कमी करण्यासाठी आवयक असलेल्या सर्व प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी येत्या २१,२२ व २३ जानेवारीला ऊर्जा खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक आायोजित केली आहे. यात राज्यातील उपलब्ध विजेचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर ३० जानेवारीपूर्वी वीज नियामक आयोगाकडे वीज दर कमी करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले, वीज दर कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. त्यासाठी नियोजन सुरू आहे. वीज दर कमी करण्यासाठी कोळशावर होणारा वाहतूक खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर वीज वितरण प्रक्रियेत होणारी वीज गळती कशी कमी करता येईल, याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येत आहे. वेकोलिकडून पुरविल्या जाणाऱ्या कोळशाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच वीज खरेदीसाठी व कोळशाच्या पुरवठ्यासाठी ओपन एक्सेस पॉलिसीच्या माध्यमातून खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. आघाडी सरकारने १२ टक्के दराने कर्ज घेतले असून, त्यापेक्षाही कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध कसे होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलर पंपाचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाच लाख सोलर पंप देण्याची घोषणा केली होती. दहा हजार पंपचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांना कमी किंमतीत सोलर पंप मिळावे, यासाठी संपूर्ण प्रस्ताव ३० जानेवारीपूर्वी मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येईल. यापुढे विजेच्या क्षेत्रात कुठल्याही विभागावर अन्याय होणार नाही, असेही ते म्हणाले. गुणवत्तापूर्ण सोलर पॉलिसी आणणार: विजेची मागणी लक्षात घेता, सोलरद्वारे वीज निर्मितीचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी गुणवत्तापूर्ण सोलर पॉलिसी तयार करण्यात येत आहे. मेडासुद्धा यासाठी कार्यरत आहे. सोलरद्वारे निर्माण झालेली वीज ग्रीडमधून वितरित न करता, आॅफ ग्रीड त्याचा उपयोग करण्यावर भर राहणार आहे. तयार होणारी सोलर पॉलिसी देशातील सर्वात गुणवत्तेची ओळखल्या जाईल, असा दावा बावनकुळे यांनी केला.