शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कंपन्यांसाठी आरेची ‘एनर्जी’ गायब

By admin | Updated: March 29, 2017 04:17 IST

शासकीय असून देखील प्रचंड मागणी असलेले आरे डेअरीचे ‘एनर्जी’हे सुगंधित दूध मुंबईतून गायब झाले असून आरेच्या वितरण

नंदकिशोर पाटील / मुंबईशासकीय असून देखील प्रचंड मागणी असलेले आरे डेअरीचे ‘एनर्जी’हे सुगंधित दूध मुंबईतून गायब झाले असून आरेच्या वितरण केंद्रांवर दूध सोडून इतर उत्पादनांचीच राजरोसपणे विक्री होत आहे. दुग्धविकास खात्यात बसलेल्या झारीतील शुक्राचार्यांनी खासगी दूध कंपन्यांशी संगनमत करून हा लोकप्रिय ब्रॅण्ड नामशेष केल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईत आरे डेअरीच्या ‘एनर्जी’ दुधाला प्रचंड मागणी होती. विशेषत: हॉस्पिटल्स्, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्यांची कार्यालये आणि मंत्रालयात या दुधाची मोठ्याप्रमाणात मागणी होती. डॉक्टर्ससुध्दा हे दूध पिण्याची शिफारस करत असत. प्रतवारीत हे दूध इतर खासगी दूध कंपन्यांच्या उत्पादनाहून सरस होते. आरेच्या ‘एनर्र्जीं’ची वाढती मागणी लक्षात घेऊन गुजरातेतील ‘अमूल’ आणि इतर काही कंपन्यांनी तशाच प्रकारचे दूध मुंबईत आणले, परंतु ग्राहकांची पसंती एनर्जीलाच होती. असे असताना हे दूध अचानक आरेच्या स्टॉल्सवरून गायब झाले आहे. वरळीतील आरेची डेअरी बंद पडल्यानंतर सरकारने निविदा काढून ‘एनर्जी’चे उत्पादन खासगी कंपन्यांकडून करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार कुतवळ फूड प्रॉडक्टने १ कोटी ३८ लाख रुपयांची रॉयल्टी भरून एनर्जीचे उत्पादन सुरू केले. परंतु अचानक ते थांबविण्यात आले. त्यानंतर ‘एनर्जी’सदृष्य अनेक खासगी ब्रॅण्ड्सची आरेच्या स्टॉल्सवरून राजरोसपणे विक्री सुरू झाली. ग्राहकांनी ‘एनर्जी’ची मागणी केली, तर खासगी कंपनीच्या दुधाची बॉटल दिली जाते.मुंबईत मोक्यांच्या जागी आरेचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यावर फक्त आरे आणि महानंदाचे प्रॉडक्टस् विकण्याचे बंधन असताना बहुराष्ट्रीय कंपन्यांची शीतपेये, खासगी कंपन्याचे दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्य पदार्थ ठेवले जातात. त्यासाठी स्टॉलधारकांकडून वेगळा ‘कर’ वसूल केला जातो. ही रक्कम कोणाच्या खात्यात जाते, याची चौकशी होण्याची गरज आहे.परराज्यातून आलेल्या ‘अमूल’ला महाराष्ट्रात दूध संकलित करण्याची परवानगी दिली जाते; मात्र महानंदा आणि आरेसारखे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी प्रकल्प बंद ठेवले जात आहेत, याबद्दल शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू ,प्रकाश आबीटकर आदींनी विधानसभेत सरकारला जाब विचारला. अमूलप्रमाणे विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून महानंदा आणि आरेला संजीवनी द्यावी, तसेच वरळीतील आरे डेअरीचे आधुनिकरण करून बंद पडलेला हा प्रकल्प पुनरूज्जीवित करावा, अशीही मागणी या आमदारांनी केली. त्यावर उत्तर देताना दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी महानंदा आणि आरेचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासन दिले.

एनर्जीला खूप मागणी होती, हे खरे आहे. पण सध्या दुधाची कमतरता आहे. आरेचे ‘एनर्जी’ बंद असले तरी ‘शक्ती’ आणि ‘पंचवटी’ हे ब्रॅण्ड सुरू आहेत. एनर्जीसाठी नव्याने निविदा काढण्यात आली आहे. लवकरच हा ब्रॅण्ड पुन्हा बाजारात येईल.- आर.जी. कुलकर्णीमहाव्यवस्थापक, दुग्धविकासमुंबईत आरेचे १८०० दूधविक्री केंद्र असून त्यावर दररोज ‘एनर्जी’च्या ४८ हजार बॉटल्सची विक्री होत असे.