शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांंना धीर द्या - बागडे

By admin | Updated: January 31, 2016 01:40 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे; भजन-कीर्तनात आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांंना धीर देऊन त्यांना सकारात्मक

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे; भजन-कीर्तनात आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांंना धीर देऊन त्यांना सकारात्मक दृष्टिकोन दिला पाहिजे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी केले.वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने गेल्या १८ जानेवारीपासून मराठवाड्यात काढण्यात आलेल्या ज्ञानोबा- तुकोबा आधार दिंडीचा शनिवारी औरंगाबादेत हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते समारोप झाला. यानिमित्त क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीस शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. बागडे म्हणाले, मोठा आर्थिक भार आणि न परवडणारी शेती हे प्रमुख कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे आहे. निराश न होता मार्ग काढा, कष्टाशिवाय पर्याय नाही, श्रमाला प्रतिष्ठा आहे, हे या आधार दिंडीतून सांगण्याचे आवाहन बागडे यांनी यावेळी केले. संपूर्ण कर्ज माफी का होत नाही, याचाही ऊहापोह त्यांनी केला. हभप तनपुरे बाबा यांनी सांगितले की, या देशात मोठमोठाली देवस्थाने आहेत, पण एकाही देवस्थानाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला नाही. पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिर ट्रस्टने मात्र १०० कोटी रुपये दिले. आत्महत्या केल्यानंतर पैसे वाटण्यापेक्षा आत्महत्या होणारच नाहीत, याची काळजी घेण्याची गरज आहे. असे पैसे वाटणाऱ्यांभोवती मात्र माध्यमांचा गराडा असतो, असे हभप शिवलीकर तात्या म्हणाले. यावेळी श्रीकांत महाराजांनी शपथेचे वाचन केले. (प्रतिनिधी)