शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लढवय्या कॉम्रेडची अखेर

By admin | Updated: February 21, 2015 04:15 IST

कम्युनिस्ट नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे (८१) यांची गेल्या पाच दिवसांपासून मृत्युशी सुरू असलेली झुंज शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता थांबली.

गोविंद पानसरे कालवश : मृत्युशी सुरू असलेली झुंज संपलीमुंबई : महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते, गोरगरीब, श्रमिक-कष्टकरी व कामगारांचे पुढारी तसेच कम्युनिस्ट नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे (८१) यांची गेल्या पाच दिवसांपासून मृत्युशी सुरू असलेली झुंज शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता थांबली. फुफ्फुसात अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कॉम्रेड पानसरे यांच्या पार्थिवाचे रात्री उशिरा जेजे हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टेम झाले. त्यांचे पार्थिव शनिवारी साडेदहा वाजता त्यांचे पार्थिव कोल्हापूर येथे एअर एॅम्ब्युलन्सने नेण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यांच्यावर कोल्हापूरमध्ये उपचार सुरु होते. शुक्रवारी संध्याकाळी त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईत ब्रीच कॅन्डी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ. फारुख उदवाडिया यांच्यासह चार जणांच्या टीमने शेवटपर्यंत त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. (प्रतिनिधी)डॉक्टरांचे अथक प्रयत्न, पण...च्कोल्हापुरातून पानसरे यांना सायंकाळी मुंबईत आणण्यात आले होते. ब्रीच कॅण्डी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु होते. साडेनऊ वाजेपर्यंत त्यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर होती. च्९.४५ च्या सुमारास फुफ्फुसात अतिरक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर त्यांना कृत्रिम श्वासनलिका देण्यात आली. च्डॉक्टरांच्या टीमने सुमारे तासभर त्यांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. पण रक्तदाब कमी होत जाऊन पावणेअकराच्या सुमारास त्यांचे हृदय बंद पडले आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मारेकरी मोकाटचहल्ल्यानंतर फरार झालेल्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.गोरगरिबांना आधार देणारे अण्णा गेलेच्सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पानसरे व त्यांच्या पत्नी उमा (६७) यांच्यावर गोळीबार केला होता. च्पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर महाराष्ट्र हादरला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेलाही हुंदका अनावर झाला. ‘गोरगरिबांना आधार देणारे अण्णा गेले,’ असा टाहो त्यांनी फोडला. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, डॉ. तात्याराव लहाने, सुप्रिया सुळे, रामदास आठवले, जितेंद्र आव्हाड यांनी ब्रीच कॅन्डी येथे भेट देऊन कॉम्रेड पानसरे यांचे अंतिम दर्शन घेतले. डॉ. लहाने यांनी कॉम्रेड पानसरेंच्या निधनाची माहिती दिली.