शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

माण तालुक्याचे टंचार्ईचे दुष्टचक्र संपेना

By admin | Updated: April 13, 2015 11:39 IST

सातारा जिल्ह्यात एप्रिल २०१४मध्ये अवघ्या तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये वाई तालुक्यात २ तर माण तालुक्यात १ टँकर होता

सातारा जिल्ह्यात एप्रिल २०१४मध्ये अवघ्या तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये वाई तालुक्यात २ तर माण तालुक्यात १ टँकर होता. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यंदा टंचाईची तीव्रता वाढली आहे. यामध्ये आत्तापर्यंत १६ टँकर सुरू करण्यात आले आहेत. सर्वाधिक पाणीटंचाई माण तालुक्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. माणमध्ये ८, खटाव २, कोरेगाव १, फलटण १, वाई तालुक्यात ४ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी भूजल पातळी वाढली होती़ यंदा ती जवळपास ५ मीटरने खालावली आहे़ परिणामी, मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत़ सांगलीत केवळ ३३ टक्के साठासांगली : गेल्या दोन वर्षांत सांगली जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठाही बऱ्यापैकी आहे. जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांमध्ये सुमारे ३३ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी ४ टक्के पाणीसाठा वाढला आहे. या सप्ताहात या वर्षातील पहिला टँकर जत तालुक्यातील उमराणी या गावी सुरू करण्यात आला आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात ९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. सांगली जिल्ह्यात ८३ लघू व मध्यम प्रकल्प आहेत. यामधील एकही भरला नसला तरी, यामध्ये सध्या ३३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २९ टक्के साठा होता. २०१२-१३मध्ये सांगली जिल्ह्यात ६२ टँकरने पाणीपुरवठा सुुरू होता. गतवर्षी ९ टँकर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होते. या वर्षी मात्र एकच टँकर सुरू आहे. मे अखेरपर्यंत २० टँकर सुरू करावे लागतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.