शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

"सामना" संपणार? अमित शहा भेटणार उद्धव ठाकरेंना

By admin | Updated: June 15, 2017 10:05 IST

अमित शहा तीन दिवसाच्या मुंबई दौ-यावर येणार असून यावेळी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचे वृत्त आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 15 - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तीन दिवसाच्या मुंबई दौ-यावर येणार असून यावेळी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्त वाहिनीने दिले आहे. शिवसेना सातत्याने सरकार विरोधी भूमिका घेऊन भाजपाची कोंडी करत असल्याने युतीच्या संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्षप्रमुखांची ही भेट होत आहे. 
 
शिवसेना भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सहभागी असली तरी, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला साथ देण्याचे कोणतेही आश्वासन शिवसेनेने दिलेले नाही. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला शिवसेनेच्या मदतीची गरज पडणार आहे. तेच या भेटीमागे खरे कारण  असल्याचे राजकीय जाणकरांनी सांगितले. शिवसेनेचा पाठिंबा महत्वाचा असल्याने भाजपा शिवसेनेला अजिबात दुखावू इच्छित नाही. 
 
आणखी वाचा 
 
मागच्या काही दिवसात शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे भाजपावर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातूनही सातत्याने नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका सुरु आहे. पण भाजपाने नरमाईची भूमिका घेत या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलेले नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा हेच त्यामागे खरे कारण आहे. यापूर्वी सलग दोनवेळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीमध्ये असतानाही काँग्रेसला साथ दिली होती. 
 
यावेळी असे घडू नये यासाठी भाजपाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अमित शहा यांची मातोश्री भेट हा त्याच रणनितीचा एक भाग आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि भाजपाची सूत्रे अमित शहा यांच्या हाती आल्यापासून शिवसेना-भाजपा परस्परांपासून अधिक दुरावले. भाजपानेही सत्तेतील वाटा देण्यावरुन शिवसेनेची शक्य होईल तितकी कोंडी केली. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या हाती पक्षाची धुरा असताना नेहमीच शिवसेना-भाजपा संबंध सलोख्याचे राहिले. मतभेद निर्माण झाले तरी, संबंध तुटेपर्यंत कधीच ताणले गेले नाहीत. मुंबई दौ-यात अमित शहा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजीपार्क येथील  स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करणार असल्याचीही माहिती आहे.