शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कपडा बाजाराचा संप मिटला!

By admin | Updated: October 18, 2016 21:29 IST

मुंबईतील प्रमुख पाच कपडा बाजारांमध्ये सुरू असलेला गुमास्ता कामगारांचा संप मंगळवारी रात्री मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारपासून मुंबईकरांना खरेदीचा आनंद लुटता

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 18 - मुंबईतील प्रमुख पाच कपडा बाजारांमध्ये सुरू असलेला गुमास्ता कामगारांचा संप मंगळवारी रात्री मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारपासून मुंबईकरांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. याआधी दक्षिण मुंबईतील सी वॉर्डमधील मुळजी जेठा मार्केट, मंगलदास मार्केट, स्वदेशी मार्केट, काकड मार्केट आणि हहनुमान गल्लीतील कपड्याच्या पाच प्रमुख बाजारपेठांमधील गुमास्ता कामगारांनी शुक्रवारपासून संप पुकारला होता.गुमास्ता कामगारांच्या संपाचा फटका गिऱ्हाईकांसोबत येथील व्यापारी वर्गाला बसला होता. सकारात्मक चर्चा होत नसल्याने मंगळवारी गुमास्ता कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत मंगलदास मार्केटबाहेर दगडफेकही केली. त्यात पोलिसांनी काही कामगारांना ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांना चर्चेसाठी बोलावले.मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर युनियनच्या शिष्टमंडळाची बैठक कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबत झाली. त्यात कामगारांच्या मागण्या जाणून घेत कामगार मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी व्यापारी संघटनांची संयुक्त कृती समिती आणि गुमास्ता युनियनची संयुक्त बैठक बोलावली आहे. कामगार मंत्र्यांच्या दालनात सायंकाळी ५.३० वाजता ही बैठक पार पडेल. सरकार सकारात्मक दिसत असल्याने सायंकाळी उशीरा संप मागे घेण्याची घोषणा गुमास्ता युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली....म्हणून संप मागे घेतलामुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांनी कामगारांची जबाबदारी घेत संप मागे घेण्याची विनंती केल्याने आंदोलन मागे घेत असल्याची प्रतिक्रिया शशांक राव यांनी 'लोकमत'जवळ व्यक्त केली. ते म्हणाले की, कामगारांच्या मागण्या रास्त असल्याचे सरकारने स्पष्ट केले. शिवाय कामगारांची जबाबदारीही घेतलेली आहे. सरकारच्या सकारात्मक चर्चेमुळे कामगारांसाठी संप मागे घेतला आहे. मात्र यापुढेही मागण्या पूर्ण होऊन त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.