शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विश्वकोश होणार अद्ययावत

By admin | Updated: March 2, 2016 00:51 IST

विश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्या असल्याने या नोंदींमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्य शाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद घेण्यासाठी विश्वकोश

पुणे : विश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्या असल्याने या नोंदींमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्य शाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद घेण्यासाठी विश्वकोश अद्ययावत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने विविध विषयांशी संबंधित ज्ञानमंडळे स्थापन केली जाणार आहेत. सद्यस्थितीमध्ये मराठी विश्वकोशाच्या २३ खंडापैकी २० खंड प्रकाशित झाले आहेत. हे खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी या कालबाह्य झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधनामुळे मोठ्या प्रमाणावर भर पडली असून, नव्या संकल्पना विचारप्रवाह पुढे आले आहेत. त्यामुळे सर्व विषय आणि ज्ञानशाखेतील झालेल्या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू होता.कोश अद्ययावत करताना विश्वकोशाचा मूळ दर्जा कायम ठेवून माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व ज्ञान क्षेत्रातील माहिती एकाच वेळी उपलब्ध करून त्याचे समीक्षण-संपादन करून अंतिम नोंद करणे आवश्यक वाटत असल्याने विविध विषयांशी संबंधित ज्ञानमंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्य विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत विविध विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये ही ज्ञानमंडळे निर्माण करण्यात येणार आहेत. विषयांच्या व्याप्तीनुसार विषय/उपविषयाला धरून एकूण ६० किंवा अधिक ज्ञानमंडळे कार्यरत रहाणार आहेत. एका ज्ञानमंडळामध्ये विषयाशी संबंधित ३ ते ५ तज्ज्ञ व एक समन्वयक यांचा समावेश असेल, अशी माहिती मराठी भाषा विभागाच्या उपसचिव अपर्णा गाडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.विश्वकोश मंडळावरील सदस्यांवर पालक म्हणून विशिष्ठ विषयाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. तसेच संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक व संशोधन संस्था येथील मराठीतून संशोधनात्मक लेखन करण्याचा अनुभव असलेले विषयतज्ज्ञ, सेवानिवृत्त विषयतज्ज्ञ, संशोधक विद्यार्थी यांना समन्वयक म्हणून नेमले जाणार आहे. विश्वकोशातील नोंदी आणि माहिती अद्ययावत करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या योजनेसाठी ४ कोटी ५२ लाख ४० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)