शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्मलदूत नेमणार

By admin | Updated: January 14, 2015 00:17 IST

निर्मलदूतांची निवड करण्याचा निर्णय; प्रती शौचालय १५0 रुपयांप्रमाणे या निर्मलदूतांना मानधन.

वाशिम : हागणदारीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेल्या राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने आता शौचालय बांधकामाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्मलदूतांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रती शौचालय १५0 रुपयांप्रमाणे या निर्मलदूतांना मानधन देण्यात येणार आहे.स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान राबविले जात आहे. त्यानुसार निर्मल भारत अभियान आता स्वच्छ भारत मिशन म्हणून नावलौकिकास आले आहे. या अभियानांतर्गत २0१४-१५ या वर्षात राज्यभरात पाच लाख ९६ हजार ४0६ वैयक्तिक शौचालय पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी डिसेंबरअखेर केवळ २५ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. उद्दिष्टपूर्ती करण्याच्या दृष्टिकोनातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने आता निर्मलदूत नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शौचालय बांधकामाच्या आराखड्यानुसार प्रत्येक गावात निर्मलदुतांची निवड करण्याचे आदेश ८ जानेवारी रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सर्व जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत. मुख्य साधन संस्थांच्या सहकार्यातून निर्मलदुतांची निवड करावी, असेही निर्देश दिले आहेत.