शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या छळप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: June 30, 2016 01:50 IST

शिरूर न्यायालयाने आरोपी यमाजी भागूजी जगताप यास कलम ४९८ (अ) नुसार एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

शिरूर : दुसऱ्या पत्नीस शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करणे तसेच उपाशी ठेवून मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात शिरूर न्यायालयाने आरोपी यमाजी भागूजी जगताप यास कलम ४९८ (अ) नुसार एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपीची आई, नणंद यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.यमाजी जगताप यांच्याबरोबर १९९२ रोजी विवाह झाला होता. पहिली पत्नी १० वर्षांपासून नांदत नसल्याने तिला घटस्फोट दिल्याची माहिती लक्ष्मीला देण्यात आली होती. लक्ष्मीशी विवाह केल्यानंतर आरोपीने तिला सहा महिने नांदविले. यानंतर त्याने पहिल्या पत्नीला (मीना) हिवरे-कुंभार येथे पुन्हा नांदवण्यास आणले. तेव्हा आरोपीचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला नसल्याचे समजले. यानंतर आरोपीने पहिल्या पत्नीसह सासू कमलाबाई, नणंद स्वाती व मीना यांनी लक्ष्मीचा छळ सुरू केला. लग्नानंतर दीड वर्षाने लक्ष्मीला मुलगा झाला. या मुलाचाही आरोपी राग करू लागला. या छळामुळे लक्ष्मी पतीपासून मुलासह वेगळी राहू लागली.लक्ष्मी नांदत असताना आरोपीने घरातील कामे येत नाही, माहेर दरिद्री आहे, लग्नात हुंडा दिला नाही, तुझा व आमचा संबंध नाही, तू इथे राहायचे नाही, असे सुनावत लक्ष्मीला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. उपाशी ठेवून छळ केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी निकाल देताना शिरूर न्यायालयाच्या न्यायाधीश एम. ए. आदुके यांनी आरोपी यमाजी भागूजी जगताप यास १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्यास एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद देण्यात येते. अ‍ॅड. नीलेश लडकत यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.