शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सक्षमीकरणातून उद्योजकतेकडे! तिरोड्यातील महिला चालवताहेत ग्रामीण अर्थव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 12:11 IST

अदानी फाऊंडेशनच्या विविध अभियानांमुळे महाराष्ट्राच्या तिरोडामधील महिलांची सामाजिक-आर्थिक स्थिती बदलत आहे.

>> कविता सरदाना 

लेखिका डायान मेरिचाईल्ड यांनी महिलांचं वर्णन 'पूर्ण वर्तुळ' असं केलं आहे. कारण महिलांमध्ये निर्माण, पालनपोषण आणि परिवर्तन करण्याची शक्ती आहे. त्यासाठी महिलांना स्वत:चं सशक्तीकरण करण्यासाठी केवळ प्रोत्साहनाची, संधीची, संसाधनांची आणि कौशल्याची गरज असते. सशक्तीकरणामुळे महिलांना स्वत:ची ओळख होते, त्यांना त्यांची क्षमता आणि सामर्थ्य कळतं. सामर्थ्य म्हणजे एखाद्या व्यवहाराच्या माध्यमातून देता येईल अशी वस्तू नव्हे. सामर्थ्य म्हणजे दानही नव्हे. सामर्थ्य मिळवावं लागतं, टिकवावं लागतं आणि त्याचं संरक्षण करावं लागतं.

देशाच्या उभारणीत महिलांचा सक्रिय सहभाग असावा, त्या केवळ लाभार्थी राहू नयेत, हे ध्येय बाळगून अदानी फाऊंडेशन त्यांच्या देशभरातील सीएसआर साईट्सच्या माध्यमातून महिलांसाठीच्या शाश्वत उपजीविकेवर काम करत आहे. महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा ब्लॉकची लोकसंख्या १ लाख ८७ हजार ३३१ इतकी आहे. तिरोड्यानं आत्मनिर्भरतेचं आणि आर्थिक स्वातंत्र्याचं उत्तम उदाहरण समोर ठेवलं आहे. विविध अभियानांमुळे इथल्या महिलांचं आयुष्य बदललं आहे. त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली असून जीवनशैलीदेखील उंचावली आहे. 

फाऊंडेशनच्या फॉर्च्युन सुपोषण या पोषण प्रकल्पामुळे महिला बदलकर्त्या होत आहेतच, यासोबतच त्यांना आर्थिक-सामाजिक स्वातंत्र्यदेखील मिळत आहे. या माध्यमातून रोजगार मिळणाऱ्या महिलाना आम्ही सुपोषन संगिनी म्हणतो. आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीत समुदायाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. यासोबतच संगिनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून पैसेही कमावतात. तिरोडा येथील या प्रकल्पाला नुकतीच ४ वर्षे पूर्ण झाली.

महाराष्ट्र सरकारच्या साथीनं अदानी फाऊंडेशन आणि मानव विकास मिशन विविध उपक्रम राबवत आहे. त्यात अगरबत्ती, धूप आणि लाखेच्या बांगड्यांची निर्मितीसह ऑयस्टर मशरुमच्या उत्पादनाचा समावेश आहे. सध्याच्या घडीला फाऊंडेशन ४३ महिला स्वयंमदत गटांच्या २५३ महिलांसोबत काम करत आहे. ज्ञानाची देवाणघेवाण करून कौशल्य विकास साधून बाजारातून मदत घेत उद्योजकता वाढवण्यावर भर दिला जात आहे. कोविड-१९ महामारी असतानाही आमच्या प्रकल्पाचा भाग असलेल्या महिला कमाई करत होत्या. यावेळी त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कारण कोविड-१९ मुळे महिलांच्या पतींच्या नोकऱ्या गेल्या होत्या. महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता करत असलेलं काम पाहून पुरुषांनी त्यांचं कौतुक केलं. ज्यावेळी सर्व काही थांबलं होतं, त्यावेळी अगरबत्ती, धूप यांना मोठी मागणी होती. त्यामुळे महिला स्वयं मदत गटाच्या सदस्यांचं उत्पन्नदेखील वाढलं. यावेळी सुपोषण संगिनींना आपणही अदानी फाऊंडेशनच्या मदतीनं स्वयं मदत गटाचा भाग व्हावं असं वाटलं. ज्यावेळी सर्वजण घरात निष्क्रिय बसून होते, त्यावेळी आमच्या सुपोषण संगिनी अधिक मेहनत घेत होत्या. त्यांची गरज पाहून फाऊंडेशननं गराडा, रामाटोला, टिकारामटोला, मेंदीपूर आणि गुमाधावडा या पाच गावांसाठी २० अगरबत्ती मशीन्सची व्यवस्था केली. अगरबत्ती निर्मितीच्या प्रक्रियेत ६० महिलांचा सहभाग होता. वर्षभराच्या कालावधीत, ज्यावेळी अनेकांच्या हातातील रोजगार गेला, त्यावेळी प्रत्येक सदस्य दिवसाला ५० ते १०० किलोचं उत्पादन घेऊन गोंदियातील बाजारात त्याची विक्री करत होता. यातून त्यांना महिन्याला ३ ते ४ हजारांचं उत्पन्न मिळत होतं. 

अशाच एका गटात सरिता चौधरी, ललिता चौघरी आणि गुणवंता चौधरींचा समावेश होता. आत्मविश्वासाची कमतरता असल्यानं त्या सुरुवातीला केवळ ५ ते १० किलो अगरबत्त्या तयार करायच्या. फेब्रुवारी २०२० मध्ये सरिता यांनी त्यांच्या इतर सहकारी महिलांसोबत ५० किलो अगरबत्त्या तयार केल्या. सविता या मेंदीपूर आणि बरबासपुरामधील सुपोषण संगिनी आहेत. उत्पादनाचा दर्जा उत्तम असल्यानं त्यांना बाजारात चांगला दर मिळाला. त्यामुळे अधिक उत्पादन घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळालं. यानंतर सरिता यांचा पती त्यांना कच्च्या मालाच्या खरेदीत, उत्पादनाच्या विक्रीत त्यांना मदत करू लागला. मार्च आणि एप्रिलमध्ये त्यांनी १५० ते २०० किलो अगरबत्ती तयार केल्या. जून २०२० मध्ये त्यांचं उत्पादन ५०० ते ५५० किलोवर गेलं. यातून त्यांनी ३५ हजार २०० रुपये कमावले. सहा महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये त्यांचं उत्पन्न ७० हजारांच्या घरात गेलं.

सरिता यांच्याप्रमाणेच अन्य सुपोषण संगिनी विविध क्षेत्रात काम करत आहेत. दोघी जणी दूध संकलन आणि चिलिंग सेंटरमध्ये (एमसी आणि सीसी) कार्यरत आहेत. नऊ जणी घरगुती डेअरी व्यवसायात आणि २२ जणी मशरुमच्या उत्पादनात कार्यरत आहेत. गोंदियातील शेतकरी लाखेचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतो. त्यामुळे लाखेच्या बांगड्यांच्या निर्मितीकडेही अनेकजणी वळत आहेत. स्वयं मदत गटाच्या ४५ महिलांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यात तिरोड्यातील आदिवासी महिलांचादेखील समवेश आहे. अदानी फाऊंडेशननं त्यांना बायबॅक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्या माध्यमातून या महिला त्यांनी तयार केलेल्या बांगड्या दुल्हनदेवी संस्था या एनजीओला विकतात. या महिला रंगीबेरंगी डिझाईन करून त्यातून महिन्याला ३ ते ४ हजार रुपये कमावतात.

तिरोडातील महिला याआधी भातशेती करून गुजराण करायच्या. त्यातून त्यांना पाच ते सहा महिने रोजगार मिळायचा. त्यानंतर उर्वरित महिने त्यांना दुसरा रोजगार शोधावा लागायचा. आता महिला करत असलेल्या कामामुळे त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढलं आहे. सोबतच महिलांना मानदेखील मिळू लागला आहे. उत्तम पोषण झालेलं, उत्पन्नाचं शाश्वत साधन असलेल्या कुटुंबांच्या माध्यमातूनच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल.(लेखिका अदानी फाउंडेशनच्या आरोग्य आणि पोषणविषयक उपक्रमांच्या सल्लागार आहेत.)