शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या कुटुंबीयांना रोजगार देणार - केसकर

By admin | Updated: April 20, 2017 05:18 IST

जनतेच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजाविणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध व्हावा

कोल्हापूर : जनतेच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजाविणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रोजगार मेळावे घेऊन, त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.केसरकर यांनी कोल्हापूर पोलीस दलाच्या कामकाजासंबंधी बुधवारी पोलीस मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या वेळी दाखल गुन्हे, पोलीस प्रशासनास उद्भवणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. घरफोड्या, चोऱ्यांचे प्रमाण वाढते आहे, ते रोखण्यासाठी रात्रगस्त वाढवा, सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा, अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.युवती व महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व स्तरांवर मोहिमा राबविल्या जात आहेत. एखादी महिला कुठेही अडचणीत आली, तर तिच्याजवळ एक अ‍ॅप (रिमोट) असेल, त्याचे बटण तिने दाबले की, काही वेळांतच तिच्याजवळ पोलीस पोहोचतील, असे नवे तंत्रज्ञान पुढे आणले जाणार आहे. ग्रामीण भागात पोलिस सुरक्षा दल स्थापन करण्यात येणार आहे. त्यांना काही अधिकारही दिले जाणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी स्वतंत्रपणे अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. बैठकीस पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांच्यासह अधिकारी व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)