शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी करणार ‘लेखणी बंद’

By admin | Updated: September 7, 2016 05:45 IST

सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई : सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी करत महासंघाने २२ सप्टेंबर रोजी ‘लेखणी बंद’ आंदोलनाची हाक दिली आहे.महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे म्हणाले की, कर्तव्यावर असताना सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण होण्याच्या प्रकरणांत गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. मारहाण व दमबाजी करणाऱ्यांचे सदस्यत्व संबंधित संस्थेमधून रद्द करावे आणि दोषींवर मोक्का लावण्याची तरतूद करावी, अशी महासंघाची मागणी आहे. मात्र यासंदर्भात निवेदन पाठवूनही शासनाने अपेक्षित निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच शासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा महासंघाने घेतला आहे.महासंघाने घोषित केलेल्या आंदोलनानुसार, मारहाण व दमबाजी करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून मंगळवारी, २० सप्टेंबरला काळ्याफिती लावून अधिकारी काम करतील. तर परिणामकारक कायद्याच्या मागणीसंबंधी शासनाच्या चालढकलीचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी, २१ सप्टेंबरला काळ्याफिती लावून निषेध व्यक्त केला जाईल. शासनाने दोन्ही दिवसांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर मोक्काचा आग्रह धरत राज्यातील सर्व खात्यांतील वर्ग १ व वर्ग २चे १ लाख २० हजार अधिकारी गुरुवारी, २२ सप्टेंबर रोजी काळ्याफिती लावून ‘लेखणी बंद’ आंदोलन करतील.नागरिकांना त्रास नाहीमहासंघाने २२ सप्टेंबरला पुकारलेल्या ‘लेखणी बंद’ आंदोलनात सरकारी अधिकारी कामावर हजर असतील. तक्रारी किंवा गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्या सर्व नागरिकांचे म्हणणे अधिकारी ऐकून घेतील; शिवाय त्यांवरील उपाययोजनाही करतील. मात्र या वेळी एकही अधिकारी लेखणी उचलणार नाही, असे महासंघाने स्पष्ट केले.