शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या अंत्यविधीस गेल्याने कर्मचारी निलंबित

By admin | Updated: September 17, 2016 02:55 IST

मुलाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला वरिष्ठांकडून असंवेदनशीलता आणि माणसुकीशून्य कारभाराचा अनुभव आला असताना हाच प्रकार कल्याण-डोंबिवली महापालिकेत

कल्याण : मुलाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला वरिष्ठांकडून असंवेदनशीलता आणि माणसुकीशून्य कारभाराचा अनुभव आला असताना हाच प्रकार कल्याण-डोंबिवली महापालिकेत वसंत सोलंकी या कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडला. आईचे निधन झाल्याने विनापरवानगी गैरहजर राहिलेल्या सोलंकीला सेवेतून निलंबित करून त्याचे निलंबनकाळातील वेतनही कापल्याचे उघड झाले. या अन्यायाविरोधात सोलंकीने स्थायीला विनंती अर्ज करून साकडे घातले होते. या प्रकरणी प्रशासनाला शुक्रवारी स्थायीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी धारेवर धरले. यावर चौकशी करून पुढील सभेत अहवाल ठेवला जाईल, असे स्पष्टीकरण उपायुक्त सुनील लहाने यांनी दिले.जानेवारीमध्ये तो क प्रभाग क्षेत्रात बेकायदा फेरीवाले हटाव मोहिमेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. दरम्यान, त्याच्या आईचे ८ जानेवारीला निधन झाले. आईच्या अंत्यविधीला जाण्यासाठी तो कामावर गेला नाही. आईच्या अंत्ययात्रेला महापालिकेचे अनेक कर्मचारीही उपस्थित होते. अंत्यविधीनंतर ८ ते २२ जानेवारीपर्यंत हक्काची रजा मिळावी, असा अर्ज सोलंकीने केला होता. परंतु, वरिष्ठांच्या चुकीच्या अभिप्रायामुळे २० जानेवारीला त्याला सेवेतून निलंबित केले. आपल्यावर अन्यायकारक कारवाई झाल्याकडे सोलंकी याने अर्जात लक्ष वेधले. याबाबत, याआधी आयुक्त ई. रवींद्रन आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले.