शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

कर्मचारी कमी, कशी होणार सेवा हमी?

By admin | Updated: May 11, 2015 03:06 IST

राज्यातील भाजपा प्रणीत सरकारने सरकारी कामे व सेवा विशिष्ट मुदतीत देण्याबाबतचा कायदा केला असला तरी राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुमारे सव्वा लाख पदे रिक्त आहेत.

संदीप प्रधान, मुंबईराज्यातील भाजपा प्रणीत सरकारने सरकारी कामे व सेवा विशिष्ट मुदतीत देण्याबाबतचा कायदा केला असला तरी राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुमारे सव्वा लाख पदे रिक्त असून, मे महिन्याच्या अखेरीस सुमारे १५ हजार कर्मचारी निवृत्त होत असल्याने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील सेवा हमी कायद्यानुसार विशिष्ट मुदतीत सेवा न देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याला ५०० ते ५००० रुपयांचा दंड केला जाऊ शकतो. याखेरीज शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद कायद्यात आहे. या कायद्याचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी स्वागत केले आहे. मात्र अपुरा कर्मचारीवर्ग व निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची प्रलंबित मागणी याकडे संघटना लक्ष वेधत आहे. तरुणांना रोजगार देण्याकरिता निवृत्तीचे वय वाढविण्यात येत नाही, असे कारण दिले जात असले तरी प्रत्यक्षात आर्थिक स्थितीचे कारण देत अनेक खात्यांमधील नोकरभरती थांबलेली आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.अगदी अलीकडे वाकोला पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने सुट्टीच्या कारणास्तव आपल्या वरिष्ठावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली व त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. राज्यातील पोलीस खात्यात गेल्या दोन वर्षांपासून पोलीस उपअधीक्षकांची १२५ पदे तर पोलीस निरीक्षकांची १५५ पदे रिक्त आहेत. यावरून या खात्यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा किती ताण असेल ते स्पष्ट होते.राज्यातील आरोग्य सेवेच्या दुरवस्थेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येतो. या खात्यात राज्यात मेडिकल आॅफिसर वर्ग-१ची (आरएमओ) ८५ पदे रिक्त आहेत. वर्ग-२ची (मेडिकल आॅफिसर) १३५ तर वर्ग-३ची ४७० पदे रिक्त आहेत. पोलिसांकरिता असलेल्या रुग्णालयात तर डॉक्टरच नाहीत. पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याचे कारण आरोग्य खात्यातील ही दारुण स्थिती कारणीभूत आहे. महसूल विभाग हा राज्यातील प्रशासनाचा कणा मानला जातो. या खात्यातही वेगळे चित्र नाही. उपजिल्हाधिकाऱ्यांची १२० पदे रिक्त आहेत. राज्य सरकारच्या अनेक खात्यांत पदे रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. हे आव्हान लक्षात घेऊनच सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया निश्चित करण्याकरिता तीन महिन्यांची मुदत दिली आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी महासंघाने निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची मागणी केली आहे. मात्र सरकारचा सध्या तसा विचार नाही.- स्वाधीन क्षत्रिय, मुख्य सचिव--------निवृत्तीच्या दिवशी पदोन्नतीहिंगोलीतील एक अधिकारी गेली दोन वर्षे पदोन्नतीकरिता पात्र होता. वरिष्ठ श्रेणीचे पद रिक्त होते. मात्र त्याच्या पदावर काम करण्यास पर्याय नसल्याने निवृत्तीच्या दिवशी त्याला पदोन्नती दिली गेली. पत्र मिळताच १५ कि.मी. प्रवास करून त्याने त्या पदाचा कार्यभार स्वीकारला व सायंकाळी निवृत्त झाला. राज्य सरकारमध्ये अनेक कर्मचारी, अधिकारी पदोन्नतीला पात्र असतानाही त्यांच्या पदाकरिता पर्याय नसल्याने त्यांना पदोन्नती दिली जात नाही. याबाबत तीव्र नाराजी आहे.