शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या वसतिगृहात कर्मचाऱ्यांचीच घुसखोरी!

By admin | Updated: March 9, 2016 05:45 IST

बोरीवलीमधील एका इमारतीत आज सामाजिक न्याय विभागाच्या नोकरदार महिलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन झाले;खरे पण याच इमारतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांनी गेले

यदु जोशी, मुंबईबोरीवलीमधील एका इमारतीत आज सामाजिक न्याय विभागाच्या नोकरदार महिलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन झाले;खरे पण याच इमारतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांनी गेले काही महिने बेकायदेशीररीत्या ठाण मांडले असून महामंडळाच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आ. रमेश कदमच्या काही सहकाऱ्यांचे त्यांना संरक्षण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोरीवली पश्चिममधील सुंदरधाम को आॅपरेटीव्ह सोसायटीमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या मालकीचे एकूण आठ फ्लॅट आहेत. त्यातील दोन एनजीओ असलेल्या विजय मर्चंट संस्थेला तर एक सोसावा संस्थेला नाममात्र भाड्यावर देण्यात आले होते. मात्र, हे तिन्ही फ्लॅट सामाजिक न्याय विभागाला परत मिळाले आहेत. उरलेले पाच फ्लॅट हे विभागाच्या ताब्यातच नाहीत. घोटाळेबाजांच्या कृपेने साठे महामंडळाचे काही कर्मचारी आणि एका आरोपीचे नातेवाइक त्या ठिकाणी राहत आहेत. विभागाचे अधिकारी हे पाचही फ्लॅट ताब्यात मिळावेत म्हणून गेले असता त्यांना विरोध करण्यात आला आणि केवळ एकाच फ्लॅटचा ताबा देण्यात आला. चार फ्लॅट अजूनही विभागाला परत मिळू शकले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. ताब्यात आलेल्या एकूण चार फ्लॅटमध्ये नोकरदार महिलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन आज सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, याच इमारतीतील अन्य चार फ्लॅटमध्ये भलतेच लोक राहत असल्याने वसतिगृहातील नोकरदार महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामंडळाचे दोन शिपाई आणि एका निलंबित चालकाचे कुटुंबही या ठिकाणी राहते, अशी माहिती आहे. एनजीओंना नाममात्र दराने कार्यालयांसाठी जागा देण्याची योजना सामाजिक न्याय विभागाने आणली होती. त्या योजनेंतर्गत विजय मर्चंट आणि सोसावा संस्थेला फ्लॅट देण्यात आले होते. त्यांनी ते परत केले. अन्य फ्लॅट कर्मचाऱ्यांनी अन्य एनजीओंच्या नावावर घेतले की अन्य कोणाच्या याची चौकशी झाल्यास धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. घुसखोरांच्या कब्जात असलेले हे फ्लॅट विभागाला परत मिळावेत यासाठी गेलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी घुसखोर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या दादांनी दमदाटी केली. कर्मचाऱ्यांनी फ्लॅट रिकामे करून दिले तरी आम्ही ताबा देणार नाही, काय करायचे ते करून घ्या, असा दम या दादांनी अधिकाऱ्यांना दिला. या फ्लॅटमध्ये घुसखोरी करून काही लोक राहत असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांपासून लपवून ठेवली.