शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा ग्राहकांना भुर्दंड

By admin | Updated: May 17, 2016 02:23 IST

महावितरणतर्फे अनेक भागांत वेळेवर वीज बिलवाटप होत नाही. तसेच, मीटर रिडिंग मुदतीनंतर घेतले जाते.

पिंपरी : महावितरणतर्फे अनेक भागांत वेळेवर वीज बिलवाटप होत नाही. तसेच, मीटर रिडिंग मुदतीनंतर घेतले जाते. वीजबचतीच्या अनेक उपाययोजना करुनही केवळ कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मुदतीत बिल न मिळाल्याने दंडाचा भार, तसेच उशिरा रिडिंग घेतल्याने दुप्पट ते तिप्पट रकमेचे बिल भरावे लागत आहे. महावितरणतर्फे मासिक बिल दिले जाते. मात्र, ते मुदतीत मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. घरगुती बिल भरण्यास पहिली आणि दुसरी अशा दोन मुदत असतात. मुदत संपण्यास एक-दोन दिवस शिल्लक असताना ही बिले नागरिकांना मिळतात. त्यामुळे मुदतीपूर्वी बिल भरता येत नसल्याने दंडासह बिल भरावे लागते. कोणतीही चूक नसताना नागरिकांना हा आर्थिक भार सोसावा लागतो. पहिल्या मुदतीत बिल भरल्यास सूट मिळते. तर, दुसऱ्या मुदतीनंतर बिल भरल्यास दंड भरावा लागतो. सवलतीपासून ग्राहक वंचित राहतो. उलट, दुसऱ्या मुदतीच्या जवळपासच्या तारखेला बिल मिळाल्याने दंड सहन करावा लागतो. बहुतेक भागात ठरावीक कालावधी बिलाचे वाटप होत नाही. बिलवाटप करणारे कर्मचारी बिले हौसिंग सोसायटीतील प्रत्येक सदनिकाधारकांच्या घरी न देता, प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांकडे देऊन मोकळा होतात. काही बिले पार्किंगमधील पत्रपेटीत कोंबली जातात. वाऱ्यामुळे ती उडून जातात किंवा पावसात भिजतात. त्यामुळे ते अनेकांना मिळत नाहीत. वाट पाहूनही बिल न मिळाल्याने नागरिकांना वीज वितरण केंद्रात जाऊन चौकशी करावी लागते. तेथून बिलाची प्रत घेऊन बिल जमा करण्याची कसरत करावी लागते. मुदतीनंतर रक्कम अदा केल्यानंतर पुढील बिलात जुन्या रकमेसह बिल येते. महावितरणचे केंद्रावर जाऊन, अधिकाऱ्यांना गाठावे लागते. ते भेटल्यानंतर त्यांना विनवणी करून, बिल कमी करून घ्यावे लागते. मुदतीनंतर बिल भरल्याची नोंद कर्मचाऱ्यांकडे नाही. (प्रतिनिधी)