शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी वेतनवाढीचा टायर पंक्चर

By admin | Updated: June 8, 2017 06:38 IST

कर्मचाऱ्यांच्या पदनिहाय वेतनवाढीला एसटी प्रशासन तयार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्मचाऱ्यांच्या पदनिहाय वेतनवाढीला एसटी प्रशासन तयार आहे. मात्र, मान्यताप्राप्त संघटना सातवा वेतन आयोग लागू करा, अशी अवास्तव मागणी करून कर्मचाऱ्यांच्या पदनिहाय वेतनवाढीला आडकाठी करत असल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.एसटी प्रशासन आणि मान्यताप्राप्त संघटना महाराष्ट्र एसटीकामगार संघटना यांच्यात १ एप्रिलपासून कामगारांच्या वेतनवाढीसाठी प्रस्ताव सादर करून त्यावर चर्चा करण्यात आली. एसटी प्रशासनाने नियुक्त केलेल्या वाटाघाटी समितीनुसार ही चर्चा सुरू होती. मात्र, मान्यताप्राप्त संघटना कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीवर ठाम आहे. परिणामी, ३ मे पासून वाटाघाटी चर्चा थांबल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.शासकीय कर्मचारी व सार्वजनिक उपक्रमांतील कर्मचारी यांचे समानीकरण होऊ शकत नसल्याचा निष्कर्ष समितीने दिला आहे. त्यामुळे वेतनश्रेणीतील सुधारणांबाबत ठोस प्रस्ताव द्यावा, असे मान्यताप्राप्त संघटनेला सांगण्यात आले होते. त्याचबरोबर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांना कधीही वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ दिलेली नाही, ही बाबही या वेळी निदर्शनास आणून दिली.महामंडळातील अन्य संघटनेने वेतनवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र, मान्यताप्राप्त संघटनेकडून कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे वेतनवाढ करारावर मान्यताप्राप्त संघटनेची स्वाक्षरी नसल्याने कर्मचाऱ्यांची वेतनवाढ होऊ शकलेली नाही.गाडी हळू चालवण्याचे आवाहनमान्सून काळात चालकांनो एसटी हळू चालवा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. पुलाच्या फरशीवरुन सुरक्षित पातळीच्यावर पाणी असल्यास एसटी पुढे नेऊ नये, अशा सूचना केली आहे. सावित्री पुलावरील दुर्घटनेनंतर एसटी प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आदेश दिले होते.३ मे समिती आणि संघटनेची बैठक. वेतनश्रेणी अभ्यास गटाचा अहवाल व्यवस्थापनाकडे आला नसल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. परिणामी, पुन्हा संघटनेकडून सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी.>असे रंगले चर्चेचे गुऱ्हाळ१ एप्रिल २०१६-२०२० या कालावधीसाठी संघटनेने मागण्या सादर केल्यानंतर एसटी प्रशासनाची वाटाघाटी समितीची नेमणूक.१५ एप्रिल वाटाघाटी समिती आणि संघटनेच्या चर्चा, सातवा वेतन आयोग लागू करावा, संघटनेची मागणी.३० एप्रिल पुन्हा सातव्या वेतन आयोगाच्या मागणीमुळे चर्चा निष्फळ.