शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरमध्ये बीडीओच्या जाचास कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: July 5, 2016 15:14 IST

देवणी पंचायत समितीत कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने मंगळवारी सकाळी उदगीरच्या राहत्या घरी गळफास लावून घेतला.

 नातेवाईकांचा आरोप

ऑनलाइन लोकमत

उदगीर : देवणी पंचायत समितीत कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने मंगळवारी सकाळी उदगीरच्या राहत्या घरी गळफास लावून घेतल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी नातेवाईकांनी गटविकास अधिकाऱ्यावर जाच केल्याचा आरोप केला आहे़उदगीर तालुक्यातील मूळचे चांदेगाव येथील रहिवासी विवेक सिरसे (वय ४२) देवणी पंचायत समितीत कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते़ ते उदगीरच्या विकास नगर भागात वास्तव्यास होते़ नोकरीसाठी दररोज उदगीर-देवणी ये-जा करायचे़ दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात वावरत हाते, असा त्यांच्या कुटूंबियांचा दावा आहे़ त्यातच मंगळवारी सकाळी त्यांनी घरातच पंख्याला गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले़ यासंदर्भात त्यांचे बंधू वसंत शिरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ मयत विवेक शिरसे यांचे बंधू भाजपाचे उदगीर तालुकाध्यक्ष वसंत शिरसे यांनी ही आत्महत्या गटविकास अधिकाऱ्यांच्या जाचाला वैतागून केली असल्याचा आरोप केला आहे़ या जाचामुळे विवेक हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे दिसत होते, असे वसंत शिरसे म्हणाले़नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जाच होत असल्याचे तोंडी सांगितले आहे़ प्रारंभी आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद करुन घेतली आहे़ आता त्यांचा जबाब नोंदवून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे तपास अधिकारी सपोनि़ रमेश सोलापुरे यांनी सांगितले़यासदंर्भात गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता़ मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही़