शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरणात कर्मचारी पदोन्नतीत घोळ

By admin | Updated: August 8, 2014 01:05 IST

आर्थिक टंचाईचा बाऊ करत नोकरभरती टाळणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने व्यपगत झालेल्या जागांवरही काही लोकांना नियुक्ती सोबतच पदोन्नती दिली आहे. ही मंडळी अधिकाऱ्यांच्या मर्जीतील

शासन आदेशाचे उल्लंघन : व्यपगत झालेल्या पदांवर नियम डावलून दिली बढतीविलास गावंडे - यवतमाळआर्थिक टंचाईचा बाऊ करत नोकरभरती टाळणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने व्यपगत झालेल्या जागांवरही काही लोकांना नियुक्ती सोबतच पदोन्नती दिली आहे. ही मंडळी अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याचे सांगितले जाते. नियमबाह्य नियुक्त्यांचा खर्च प्राधिकरण कसा सहन करू शकते, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागासाठी लागू असलेला शासन निर्णय जीवन प्राधिकरणातील नोकरभरतीसाठी लागू होतात. पाटबंधारे विभागासाठी असलेल्या ३१ जानेवारी १९८९ च्या निर्णयानुसार जवळपास १२ पदे व्यपगत (बाद) झाली आहे. अर्थात या पदांवर कुणालाही नियुक्ती देणे नियमबाह्य ठरते. परंतु प्राधिकरणाने या पदांवरही नियुक्ती देण्याची किमया साधली आहे. नागपूर विभागात आठ ते दहा तर राज्यात जवळपास २० ते २५ लोकांना अशी नियमबाह्य नियुक्ती देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर काही लोकांना पदोन्नतीही दिली आहे.रोजंदारी कर्मचाऱ्यांसह पाणीपुरवठा योजनेवरील क्षेत्रीय कर्मचारी जसे पंप ड्रायव्हर, हेल्पर, मिटर दुरुस्ती कर्मचारी यांनाही व्यपगत झालेल्या पदांवर सामावून घेण्यात आले आहे. विशेषत: टाईम किपर (समयपाल) या पदावर अधिक लोकांचा भरणा करण्यात आला आहे. सदर पद व्यपगत झाले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपा तत्त्वावरही नियुक्ती दिली जात नाही. यासाठी आर्थिक अडचण ही बाब समोर केली जाते. वास्तविक अनुकंपा तत्त्वाचे उमेदवार हलाखीचे जीवन जगत आहेत. संपूर्ण कुटुंबाचा गाडा तोकड्या रकमेवर ढकलावा लागत आहे. असे असताना त्यांना नियुक्ती देण्याचे टाळले जात आहे. मागील २० वर्षांपासून प्राधिकरणाने पदभरती बंद केली आहे. दुसरीकडे पदे रद्द झालेली असताना त्यावर कार्यरतच लोकांना नियुक्तीसोबतच पदोन्नती देण्यात आलेली आहे.